नांदेड,(जिमाका)-केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत बालशक्ती पुरस्कार देण्यात येतो. ज्या मुलांनी शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ नाविण्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केलेली आहे, त्यांना हा पुरस्कार देण्यात येतो. प्रधानमंत्री राष्ट्रीय ‘बाल पुरस्कार’ 2025 साठी 31 जुलै 2024 पर्यंत https://awards.gov.in संकेतस्थळावर अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा महिला बाल विकास अधिकारी आर.आर.कांगणे यांनी केले आहे.
प्रधानमंत्री राष्ट्रीय’बाल पुरस्कार’ हा ज्या मुलांचे वय 5 पेक्षा अधिक व 18 वर्षापेक्षा कमी आहे अशा बालकांसाठी असून शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपूण्यपूर्ण कामगिरी केलेली आहे. अशा बालकांना हा पुरस्कार दिला जातो. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 साठी अर्ज https://awards.gov.in या संकेतस्थळामार्फत ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत.