नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या पित्याचे छत्र दहा वर्षापुर्वी हरवल्यानंतर सुध्दा त्यांच्या बालिकेने 93.80 टक्के गुण दहावीच्या परिक्षेत संपादन करून यश मिळवले आहे. ही बालिका श्री.शिवाजी हायस्कुल कंधार येथील विद्यार्थीनी आहे.
गायत्री गणेश धोंडगे यांच्या वडीलांचा मृत्यू दहा वर्षापुर्वी झाला. अत्यंत कमी संसाधन अर्थात आर्थिक परिस्थिती गंभीर असतांना सुध्दा गायत्रीच्या आईने चार लेकरांना शिकवण दिली. काटकसर करत गायत्रीच्या आईने आणि त्यांचे मामा उत्तम पाटील वरपडे यांनी वेळोवेळी मदत केली याचा परिणाम गायत्री गणेश धोंडगेने दिलेल्या दहावीच्या परिक्षेत आला. तिने मराठी-88, हिंदी-88, इंग्रजी-93, गणित-87, विज्ञान आणि तंत्रज्ञान-93 आणि सामाजिक शास्त्र-97 असे 500 पैकी 459 गुण प्राप्त करून 93.80 टक्के अशा सन्मानाने ही परिक्षा उत्तीर्ण केली. गायत्री धोंडगेने आपल्या यशामध्ये श्री.शिवाजी हायस्कुलचे शिक्षक, आपली आई आणि आपल्या मामांना धन्यवाद दिले आहेत.