हभप समाधान महाराज यांचे कीर्तन , रक्तदान, नेत्ररोग तपासणी आणि शिशु बालगृहात अन्नदान होणार
नांदेड – नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे विकास पुरुष, लोकप्रिय आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक एक जून रोजी विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. अशी माहिती आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाप्रमुख गंगाधर बडूरे, जिल्हाप्रमुख आनंदराव बोंढरकर , जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, सह संपर्कप्रमुख दर्शन सिंग सिद्धू यांनी दिली आहे.
अवघ्या साडेचार वर्षाच्या काळात आपल्या कार्यकर्तुत्वांनी नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात विकासाची असंख्य कामे खेचून आणणाऱ्या आमदार बालाजीराव कल्याणकर यांची ओळख विकास पुरुष म्हणून निर्माण झाली आहे . जनसामान्यांच्या हितासाठी सदैव कामगिरी करणारे आमदार बालाजीराव कल्याणकर यांचा वाढदिवस याही वर्षी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे . दिनांक एक जून रोजी वाढदिवसानिमित्त भक्ती लांस मालेगाव रोड येथे हरिभक्त पारायण समाधान महाराज यांचे सायंकाळी किर्तन आयोजित करण्यात आले आहे. सकाळी सात वाजता हनुमान गड येथे महाआरती आयोजित करण्यात आली आहे . त्यानंतर भक्ती लॉन्स येथे भव्य रक्तदान शिबिर आणि नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे . याचवेळी गरजू रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहे. याशिवाय सुमन बालगृहात भोजनाची पंगत देण्यात येणार आहे. याशिवाय श्याम नगर येथील महिला रुग्णालयात फळे वाटप करण्यात येणार आहेत .या सर्व कार्यक्रमांना आमदार बालाजीराव कल्याणकर यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत जिल्हाप्रमुख गंगाधर बडूरे , जिल्हाप्रमुख आनंदराव बोंढारकर , जिल्हा प्रमुख उमेश मुंडे यांच्यासह संपर्कप्रमुख दर्शन सिंधू महाराज यांनी दिली आहे.