प्रीतम जोंधळे यांच्या वाढदिवसानिमित्त 28 मे रोजी मोफत आरोग्य शिबीर

नांदेड- इतवारा भागातील सामाजिक कार्यकर्ते प्रीतम जोंधळे यांच्या वाढदिवसानिमित्त 28 मे रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

सामाजिक कार्यकर्ते प्रीतम जोंधळे मित्र मंडळाच्या वतीने मोहम्मद अली रोड लक्ष्मी श्री कॉम्प्लेक्स येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये नेत्र तपासणी करून चष्म्याचे वाटप करण्यात येणार असून रक्तदान शिबीराचेही आयोजन करण्यात आले असून रक्त दात्याला स्टीलची पाण्याची बॉटल देण्यात येणार आहे. या शिबिरात सर्व शरीर तपासणी व निदान केले जाणार आहे. तसेच हृदय विकार,मुतखडा उपचार व शस्त्रक्रिया, दमा, मेंदूज्वर, रक्तदाब व रक्ताच्या सर्व प्रकारचे निदान व उपचार करण्यात येणार असून यासाठी तज्ञ डॉ. निलेश बास्टेवाड,डॉ.गजानन अल्पेवाड,डॉ.विलास मुसळे,डॉ सोपान जाधव,डॉ.अब्रार शेख,डॉ.प्रशांत मेरगेवाड हे रुग्णांची तपासणी करणार आहेत. यासाठी जनसंपर्क अधिकारी धम्मानंद डवळे, विनोद राजेगोरे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. या शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन प्रीतम भैया जोंधळे मित्र मंडळ नांदेडच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *