नांदेड(प्रतिनिधी)-द. म.रे च्या नांदेड मंडळ डिव्हीजन रेल्वे प्रबंधक यांना हज यात्री करूसाठी कन्फर्म तिकीट मिळत नसून हज यात्रेकरूना विशेष सेवा मिळावी या करिता रेल्वे प्रशासनाला खादिम हुजाज ट्रस्ट नांदेड च्या वतीने निवेदन देण्यात आले. सदरील निवेदनात नांदेड येथील यात्रेकरूना आरक्षीत सेवा मिळत नसल्या प्रवासात हेळसांड होत आहे. त्यामुळे देवगिरी आणि राज्यराणी एक्सप्रेसला २८ आणि २९ मे या दोन दिवसा करिता हज यात्रे निमित्त दोन स्लिपर कोच वाढवण्यात यावे तसेच हजयात्रेकरू बांधवाना सहकार्य करावे अशी विनंती खादिम हुजाज ट्रस्ट नांदेड यांच्या वतीने करण्यात आली आहे. या वेळी खादिम हुज्जज ट्रस्ट चे अखिल अहमद कंधारी , मोहम्मद नवीद इक्बाल, मीर जावीद अली , शेख मोईन, हसनैन शेख, इक्बाल सिद्दीकी, बशीर अहमद,हैदर अली उपस्थित होते.
More Related Articles
देगलूर येथे घरफोडून चोरी
नांदेड(प्रतिनिधी)-विद्यानगर देगलूर येथे एक घरफोडून चोरट्यांनी 65 हजार 500 रुपयंाचा ऐवज चोरल्याचा प्रकार घडला आहे.…
शरिर सुखाची मागणी करणाऱ्या पत्रकाराविरुध्द गुन्हा दाखल
नांदेड(प्रतिनिधी)-स.आदत हसन मंटो अत्यंत विद्रोही व्यक्तीमत्व त्यांनी सांगितलेल्या अनेक बाबी जवळपास 75 वर्षानंतर सुध्दा पत्रकारांबाबत…
भरधाव ट्रकने 9 दुचाकींना धडक दिली; एकाचा मृत्यू एक गंभीर जखमी
नांदेड(प्रतिनिधी)-राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 वर एका ट्रकने बारड चौकात नऊ दुचाकींना धडक दिली. त्यात एका…
