नांदेड(प्रतिनिधी)-आज 21 मे रोजी भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाली होती. त्यानंतर हा दिवस दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस म्हणून पाळला जातो. आज पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस प्रतिज्ञा वाचली. त्याचे पाठीमागे उपस्थितांनी त्या प्रतिज्ञेचे वाचन केले.
दि.21 मे 1991 रोजी भारताचे सहावे पंतप्रधान राजीव गांधी यांची श्री पेरंबदुर येथे दहशतवाद्यांनी हत्या केली होती. त्यांच्या सोबत त्यांचे सहा सुरक्षा रक्षक सुध्दा मरण पावले होते. त्यानंतर 21 मे हा दिवस दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस म्हणून पाळला जातो. हिंसाचार आणि दहशतवाद बद्दल प्रतिज्ञा म्हणण्याची प्रथा सुरूवात झाली.
आज पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी या प्रतिज्ञेचे वाचन केले. त्यांच्या पाठोपाठ उपस्थित पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, मंत्रालयीन अधिकारी व कर्मचारी यांनी या प्रतिज्ञेचे सामुहिक वाचन केले. याप्रसंगी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरिक्षक शामसुंदर टाक, पोलीस कल्याण विभागाचे पोलीस निरिक्षक नामदेव रिठ्ठे, दहशतवाद विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक गंगाधर गायकवाड, तसेच सर्व शाखांचे पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार मंत्रालयीन कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक सुर्यभान कागणे, पोलीस अंमलदार संजय ांगवीकर, मारोती कांबळे यांनी केले.