पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांच्या बदल्या करण्यासाठी मुदतवाढ मागितली

नांदेड(प्रतिनिधी)-4 जून पर्यंत लोकसभा निवडणुकीची आचार संहिता असल्या कारणाने पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांच्या बदल्यांसाठी 30 जून 2024 पर्यंत मुदत वाढ द्यावी असे पत्र आस्थापना विभागाचे अपर पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांनी राज्याच्या गृहविभागातील अपर मुख्य सचिवांना पाठविले आहे.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 2(6 अ) प्रमाणे पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांच्या सर्वसाधारण बदल्या एप्रिल-मे या महिन्यामध्ये प्रत्येक वर्षी करणे बंधनकारक आहे. पण सध्या लोकसभा निवडणुक 2024 ची प्रक्रिया सुरू आहे. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी 4 जून 2024 रोजी होणार आहे. अर्थात 4 जून पर्यंत आचार संहिता लागू राहिल. त्यामुळे पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांच्या सर्वसामान्य बदल्या 2024 साठी दि.31 मे 2024 पर्यंत करणे शक्य होणार नाही. म्हणून पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांच्या सन 2024 च्या सर्वसाधारण बदल्या करण्यासाठी 30 जून 2024 पर्यंत मुदतवाढ द्यावी असे पत्र पाठविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *