नामावंत सेवानिवृत्त पोलीस उपनिरिक्षक उत्तम वरपडे यशवंत शेतकरी

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस विभागात काम करतांना शेतकरी पुत्राने आपल्या मुळ शेतीच्या कामाकडे दुर्लक्ष केले नाही. यंदा सेंद्रीय शेतीकरून आंब्याच्या अडीच हजार झाडांपासून 15 लाख 51 हजार रुपये एवढे मोठे उत्पादन मिळवणाऱ्या सेवानिवृत्त पोलीस उपनिरिक्षक उत्तम वरपडे पाटील आणि त्यांचे सुपूत्र साईप्रसाद उत्तमराव वरपडे पाटील यांचा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सत्कार करून त्यांचे कौतुक केले आहे. आज जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील एकूण 47 शेतकऱ्यांचाा सेंद्रीय शेतीसाठी सन्मान केला.
पोलीस शिपाई या पदावर भरती झालेले बाचोटी ता.कंधार येथील शेतकरी पुत्र उत्तम शंकरराव वरपडे पाटील यांनी सन 2006 पासून आपल्या शेतात आंब्याची झाडे लावण्यास सुरूवात केली. पहिल्या वर्षी 400 झाडे लावली होती. ती आज 15 एकर परिसरात अडीच हजार झाली आहेत. या अडीच हजार झाडांवर 30 टन आंब्यांचे उत्पादन झाले. ते उत्तम शंकरराव वरपडे यांनी 15 लाख 51 हजार रुपयांना विक्री केले. या आंबराईमध्ये सुरूवातीपासूनच उत्तम वरपडे यांनी फक्त सेंद्रीय खतांचा वापर केला. कोणत्याही केमिकलचे वापर केले नाही. औषधी सुध्दा त्यांनी सेंद्रीय प्रकारचीच वापरली. पोलीस आणि शेतकरी अशी दोन भुमिका वठवत उत्तम वरपडे सन 2023 च्या मे महिन्यात सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सुरू असलेल्या मेहनतीला आज जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शाब्बासकीची थाप दिली. आपल्या पोलीस जीवनात सुध्दा वरपडे हे नामवंत पोलीस, यशवंत असे पोलीस अंमलदार आणि पोलीस अधिकारी होते. आज शेतकरी म्हणून सुध्दा त्यांनी आपला यशवंतपणा सिध्द केला आहे. आज जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सेंद्रीय शेतीवर आधारीत उत्पादन मिळवणाऱ्या जिल्ह्यातील एकूण 47 शेतकऱ्यांचा सत्कार केला. त्यात उत्तम शंकरराव वरपडे यांचे सुपूत्र साईप्रसाद उत्तमराव वरपडे पाटील यांचाही समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *