नांदेड(प्रतिनिधी)-इतवारा भागातील मच्छी मार्केटजवळ, मॅफ्कोपासून हाकेच्या अंतरावर एक जोरदार जुगार अड्डा सुरू आहे. स्थानिक गुन्हा शाखेत कोणाचे आहे हे बिट हा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा मांडण्याची संधी मिळाली आहे.
शहरात, जिल्ह्यात जुगार अड्डे, गुटखा, अवैध रेती वाहतुक जे व्यवसाय करतात त्यांच्या मागे नक्कीच कोणाचे तरी पाठबळ असते. त्याच्या शिवाय हे व्यवसाय चालणे अवघड आहे. आजच प्राप्त झालेल्या माहितीनुसार इतवारा भागातील मच्छी मार्केटजवळ, मॅफ्कोपासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला जुगार अड्डा कोणाच्या बिटमध्ये येतो हा प्रश्न समोर आला आहे. या जुगार अड्ड्यामध्ये जातांना जुगार खेळणाऱ्याला, त्या ठिकाणी सावकारी व्यवसाय करणाऱ्याला किंवा पाहण्यासाठी गेलेल्यांना सुध्दा आपला मोबाईल हातात घेता येत नाही. हा भाग म्हणजे त्या जुगार अड्ड्याच्या सुरक्षेसंबंधी जोडलेला आहे. पण ज्याचे बिट आहे त्यालाही बाब माहित नाही असे घडते यावर कोणाचाही विश्र्वास बसणार नाही. असो सर्वांना आपले अधिकार भारतीय संविधानाने दिलेले आहेत. जुगार अड्ड्यामुळे अनेक कुटूंबाचा उदर्हनिर्वाह चालतो त्यामुळे त्यावर जास्त लिहिणे अयोग्यच आहे.