नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वसमत फाटया पासून जवळ एका आमराई जवळच्या आखाड्यावर जबरी चोरी झाली असून 2 लाख रुपये रोख रक्कम, 4 मोबाईल, सिमकार्ड असे साहित्य तीन ते चार जणांनी बळजबरीने चोरून नेले आहे.
देवराव शंकरराव नवले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.13 मे रोजी रात्री 9.30 वाजेच्यासुमारास वसमत फाट्यापासून 2 किलो मिटर अंतर असलेल्या आखाड्याजवळ ते आणि त्यांचे मित्र चांदू हे दुचाकीवर बसून मेंढला गावाकडे जात असतांना एका चार चाकी वाहनाने त्यांची दुचाकी धडक देवून पाडली. त्यातून तीन ते चार लोक उतरले आणि या दोघांना चाकूचा धाक दाखवून, मारहाण करून 2 लाख रुपये रोख रक्कम असलेली बॅग, दोन मोबाईल, सिमकार्ड तसेच चांदूच्या खिशातील दोन मोबाईल, दोघांजवळी पैशांची पॉकीटे बळजबरीने चोरून नेली आहेत.अर्धापूर पोलीसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 394, 34 प्रमाणे गुन्हा क्रमांक 222/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास अर्धापूरचे पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम हे स्वत: करणार आहेत.
अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 लाखांपेक्षा जास्त किंमतीच्या ऐवजाची जबरी चोरी; चार चाकी वाहनातून आले होते दरोडेखोर
