नांदेड(प्रतिनिधी)-मुखेड येथे एकापेक्षा जास्त लोकांची घरे फोडून चोरट्यांनी 1 लाख 13 हजारांचाा ऐवज लंपास केला आहे.
अश्विनी राम आवळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 11 मे च्या रात्री 11.30 वाजेपासून ते 12 मेच्या पहाटे 5 वाजेदरम्यान त्यांच्या आणि साक्षीदारांच्या घरी काही चोरट्यांनी घरांची कुलूपे तोडून आत प्रवेश केला. ज्या इतर घरांमध्ये चोरी झाली. त्यांची नावे द्रोपदाबाई वाघमारे आणि उत्तम रावण सोनकांबळे अशी आहेत. चोरट्यांनी अश्र्विनी आवळे यांच्या घरातून 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दोन सेवनपिस 30 हजार रुपये, 8 ग्रॅम वजनाची काळ्या मन्यांची पोत 25 हजार रुपयांची, 8 ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुमके 15 हजार रुपयांचे, 2 ग्रॅम वजनाची सोन्याची कानातील मुगडी 10 हजार रुपयांची, दोन सोन्याच्या प्रत्येकी 5 ग्रॅम वजनाच्या अंगठ्या 30 हजार रुपये किंमतीच्या आणि चांदीचे 15 तोळे वजनाचे हातातील कडे 7 हजार रुपयांचे असा एकूण 1 लाख 13 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. तसेच इतर दोन साक्षीदार अर्थात ज्यांच्या घरी चोरी झाली त्यातील द्रोपदाबाई वाघमारे यांच्या घरातून 15 तोळे वजनाचे चांदीची चैन, 5 ग्रॅम वजनााचे सोन्याचे पान, एक ग्रॅम वजनाचे सोन्याचे 20 मनी आणि रोख 7 हजार रुपये असा ऐवज चोरीला गेला आहे. उत्तमराव सोनकांबळे यांच्या घरातून चोरट्यांनी 5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, अर्ध्या ग्रॅम वजनाची सोन्याची नथनी, 10 तोळे वजनाची चांदीची चैन असा ऐवज चोरीला गेल्याचे समजले आहे अशी नोंद पोलीस जप्तरी आहे. मुखेड पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या 457, 380 या कलमांनुसार गुन्हा क्रमांक 152/2024 दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरिक्षक विनोद चव्हाण या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.