नांदेड(प्रतिनिधी)-देगलूर शहरातील सिध्दार्थनगर भागात बांधकाम होत असलेल्या एका नवीन संकुलात एक अनोळखी 45 वर्षीय इसमाचा मृत्यदेह सापडला आहे. देगलूर पोलीसांनी त्या अनोळखी मयत माणसाची ओळख पटावी म्हणून शोध पत्रिकार जारी केली आहे.
देगलूर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दि.1 मेच्या सकाळी 10 वाजेच्यासुमारास सय्यद सुफियान सय्यद अजहर यांच्या बांधकाम होत असलेल्या नवीन कॉम्प्लेक्समध्ये सिध्दार्थनगर देगलूर येथे एक अनोळखी 45 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह सापडला. पोलीसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्यास वैद्यकीय उपचारासाठी नेले असतांना वैद्यकीय सुत्रांनी तो पुर्वीच मरण पावल्याचे जाहीर केले. या संदर्भाने देगलूर पोलीसांनी आकस्मात मृत्यू क्रमांक 107/2024 दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरिक्षक एन.टी.फड यांच्याकडे देण्यात आला आहे.
पोलीसांनी जारी केलेल्या शोध पत्रिकेनुसार अनोळखी मयत माणसाचे वय 45 वर्ष असून उंची 5 फुट आहे. त्यांचा रंग सावळा आहे. डोक्यावर लाल केस आहेत. दाढीचे केस पांढरे आणि काळे असे वाढलेले आहेत. त्यांनी पांढऱ्या रंगाचा चौकडा शर्ट व काळसर रंगाची पॅन्ट परिधान केली असून भगव्या रंगाची दस्ती गळ्यात आहे. या वर्णनाच्या व्यक्तीला कोणी ओळखत असेल तर त्यांनी या बाबत देगलूर पोलीस ठाण्यात माहिती द्यावी. देगलूर पोलीस ठाण्याचा दुरध्वनी क्रमांक 02425-255100 असा आहे. यावर सुध्दा माहिती देता येईल.
देगलूरमध्ये 45 वर्षीय अनोळखी मयत व्यक्ती सापडला; पोलीसांचे ओळख पटविण्यासाठी जनतेला आवाहन
