नांदेड(प्रतिनिधी)-गाव नमुद क्रमंाक 8(अ) मध्ये मोकळ्या भुखंडाची नोंद घेण्यासाठी पाच हजाराची लाच मागणी करून ती स्विकारणाऱ्या मांडवी आणि अतिरिक्त पदभार चिखली (खु) येथील ग्रामसेवक प्रेमसिंग मोतीराम आडे यास मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांच्या करीता असे लिहुन प्रेमसिंग मोतीराम आडेला निलंबित करण्यात आले आहे. स्थळप्रतिवर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची स्वाक्षरी आहे असे या पत्रात लिहिले आहे. पण करीता असे लिहुन स्वाक्षरी करतांना स्वाक्षरी करणाऱ्याने आपले पुर्ण नाव आणि पदनाम लिहिने आवश्यक आहे असा सन 2018 मधील शासन निर्णय आहे.
दि.24 एप्रिल 2024 रोजी मुळ पदभार मांडवी आणि अतिरिक्त पदभार चिखली(खु) अशा दोन ठिकाणचे ग्रामसेवक असलेल्याा प्रेमसिंग मोतीराम आडे याने एका तक्रारदाराला त्याच्या मालकीच्या भुखंडाची नोंद गाव नमुना क्रमांक 8(अ) या रजिस्टरला नोंद घेण्यासाठी 5 हजारांची लाच मागितली. त्यावेळी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने प्रेमसिंग आडेला अटक केली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आपण केलेल्या कार्यवाहीचे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांना पाठविले. त्यानंतर जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांची स्थळप्रतिवर स्वाक्षरी आहे असे नमुद करून 2 मे रोजी ग्रामसेवक प्रेमसिंग मोतीराम आडेचे निलंबन पत्र जाहीर केले आहे. या पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्याने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, नांदेड करीता असे लिहुन स्वाक्षरी केली आहे. स्वत:चे पुर्ण नाव आणि आपले पदनाम मात्र स्वाक्षरी करणाऱ्याने लिहिलेले नाही. सन 2018 मध्ये राज्य शासनाने शासन निर्णयानुसार करीता लिहुन स्वाक्षरी करायची असेल तर ते अत्यंत निकडीचे काम असावे आणि स्वाक्षरी करणाऱ्याने आपले पुर्ण नाव लिहुन, आपले पदनाम लिहुन स्वाक्षरी करावी असे त्या पत्रात नमुद आहे. पण या पत्रात असे काही केलेे नाही.