नांदेड(प्रतिनिधी)-मतदान संपण्याच्या 48 तासादरम्यान शॉर्ट मॅसेज सर्व्हीसेस(एसएमएस) आणि इतर सोशल मिडीया वरुन माध्यमांचा गैरवापर करणाऱ्यांवर कार्यवाही होणार आहे. त्यामुळे सर्वांनी एसएमएस आणि सोशल मिडीयाचा वापर दक्षतेने करावा असे आवाहन पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले आहे.
सार्वत्रिक लोकसभा निवडणुक 2024 च्या अनुशंगाने आदर्श आचार संहिता चालू आहे. त्या आचार संहितेचे काटेकोर पालन आवश्यक आहे. या काळामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी म्हणून पोलीस यंत्रणा सर्व बाजूने लक्ष ठेवून आहे. सध्या सर्वत्र सोशल मिडीयाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. पोलीस अधिक्षक कार्यालयात सोशल मिडीयावर पोस्ट टाकणाऱ्या समाज कंटकांवर सोशल मिडीया मॉॅनिटरींग सेल रात्र-दिवस लक्ष ठेवून आहे. निवडणुक आयोगाला याची जाणिव आहे की, निहीत हित संबंध असलेल्या व्यक्ती मोठ्या प्रमाणात एस.एम.एस. प्रसारीत करू शकतात. ज्यामुळे निवडणुक आयोगाच्या सुचनाचे उल्लंघन होईल. अशा पोस्ट निवडणुकीच्या प्रक्रियेत बाधा आणू शकतात. भयमुक्त निवडणुक व्हावी. निष्पक्ष व शांततेत पार पडावी यासाठी निवडणुक आयोगाच्या सुचनेनुसार नांदेड पोलीस दलाकडून मोबाईल क्रमांक 8308274100 यावर तक्रार सुध्दा करता येईल.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी नंादेडच्या जनतेला आवाहन केले आहे की, मतदान संपण्याच्या 48 तासादरम्यान जर नागरीकांना निवडणुक प्रचाराचे, 2 समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे पोस्ट आणि बॅनर समाजमाध्यमांमध्ये प्रचारीत झाले तर ते आचार संहितेचे उल्लंघन ठरेल.पोलीसांना तक्रार आल्यानंतर सोशल मिडीया, कॉल, एसएमएस, व्हाटसऍप मॅसेजस, पोस्ट या सर्वांची चौकशी करून त्यांच्याविरुध्द लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951, निवडणुक नियम 1961 नुसार कायदेशीर कार्यवाही केली जाणार आहे.