नांदेड,(प्रतिनिधी)-आज मंगळवार रोजी जिल्हा व सत्र न्यायालय, नांदेड येथे मुस्लीम ॲडव्होकेट फोरम नांदेड तर्फे राष्ट्रीय सण रमजान ईद निमीत्त ईद ए मिलापचा कार्याक्रम आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमात सर्व प्रथम ॲड. सज्जाद अली कादरी यांच्या मार्फत कुरान शरीफचे आयातची तीलावत करण्यात आली. या कार्यक्रमात अध्यक्ष स्थानी इंचार्ज प्रिन्सीपन डीस्ट्रीक्ट जज नांदेड एस.ई. बांगर होते. या कार्यक्रमात आलेले सर्व सन्माननीय न्यायाधिशांचे मुस्लीम ॲडव्होकेट फोरम, नांदेड तर्फे सत्कार/गुलपोशी करण्यात आले. या ईद ए मिलापच्या कार्यक्रमात नांदेड अभिवक्ता संघाचे अध्यक्ष अँड.आशिष गोदमगांवकर, जिल्हा सरकारी अभियोक्ता अँड.रणजीत देशुमख व इतर सर्व सन्मानीय जिल्हा न्यायालयातील सर्व न्यायाधिश आणि न्यायालयातील सर्व कर्मचारी व जिल्हा न्यायालयातील सर्व वकील बांधव व भगीनी यांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती. सदर कार्यक्रमात प्रमुख न्यायधिश बांगर यांनी आपले मनोगतामध्ये असे सांगीतले की, न्यायालयात सर्व न्यायाधिश व सर्व कर्मचारी व सर्व वकील बांधव व भगीनी यांना एकत्र रित्या एका माळ्यामध्ये पुरवुन हा कार्यक्रम आयोजीत केला आहे. असे कार्यक्रम भविष्यात चालत राहावे अशी आशा व्यक्त केली. या नंतर मुस्लीम ॲडव्हाकेट फोरमचे पेट्रॉन ॲड. एम. झेङ. सिद्दीकी यांनी रमजान या पवित्र महिन्याच्या बाबतीत माहिती दिली.मुस्लीम समाजातील श्रीमंत व्यक्ती हा जकातच्या, व दान धर्माच्या माध्यमाने गरीबांची, शेजाऱ्यांची मदत करतो. रमजान पवित्र महिन्यात एका महिन्याचे उपवास ठेऊन एक अल्लाहची ईबादत मध्ये व्यस्त राहतो. अश्या प्रकारे रमजान या पवित्र महिन्या बाबत विचार मांडले. या व्यतरिक्त मा. सर्वोच्च न्यायालय, दिल्लीचे चिफ जस्टीस चंद्रचुड यांनी निवडणुकीत प्रत्येक व्यक्तीने मतदानाचा हक्क बजाऊन जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे अशा प्रकारे सांगीतल्याचे मत मांडले. या नंतर नांदेड अभिवक्ता संघाचे अध्यक्ष अँड.आशिष गोदमगांवकर यांनी रमजान या पवित्र महिन्या बाबत मुस्लीम धर्मीय लोक हे एकजुटीने एक परमेश्वराची अर्चना करतात व एक महिना उपवास ठेवतात एक महिन्याचा उपवास ठेवणे हे माणसाच्या शरीरा करीता आरोग्या उत्तम ठेण्याचा एकमेव मार्ग आहे असे आपले मत व्यक्त केले. या कार्यक्रमात मुस्लीम ॲडव्होकेट फोरमचे अध्यक्ष ॲड. अय्युबोद्दीन जागीरदार, उपाध्यक्ष ॲडव्होकेट मोहम्मद शाहेद, सचिव ॲडव्होकेट सय्यद साजीद, सह सचिव ॲडव्होकेट वाहेद अहेमद, कोषाध्यक्ष ॲडव्होकेट जावेद खान, ॲडव्होकेट शहेजान सिद्दीकी ॲडव्होकेट लुबना फरहीन व फोरमचे सदस्य अरशद नाईक, शेख रऊफोद्दीन, शेख शफीयोद्दीन व इतर सर्व मुस्लीम वकील बांधव यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रमाची व्यवस्था केली. कार्यक्रमानंतर शिर खुर्माचे स्वाद सर्व माननीय न्यायाधिश, सर्व न्यायालयीन कर्मचारी, जिल्हा न्यायालयातील सर्व वकील बांधव व भगीनी व पक्षकार यांनी स्वाद घेतला व या कार्यक्रमाची प्रस्तावना ॲडव्हाकेट स. अरिबोद्दीन यांनी केली व यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
More Related Articles
खाजगी सावकारीला कंटाळून झालेल्या आत्महत्येप्रकरणी तिन जणांविरुध्द गुन्हा दाखल
नांदेड(प्रतिनिधी)-काल अंबीकानगरमध्ये खाजगी सावकारीच्या त्रासाला कंटाळून झालेल्या आत्महत्येप्रकरणी भाग्यनगर पोलीसांनी तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल केला…
खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या नॉर्मल व सीबीसी योजनेत दंडव्याज माफीची संधी
नांदेड – महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या खादी आयोग निधी व कन्सोटियम बँक फायनान्स…
इलेक्शन का रिझल्ट तथा न्युज चैनल तथा सोशल मीडिया पर चल रही चर्चा
नांदेड- वैसे यह मेरा विषय नहीं है…क्यों के मैं राजनीती से कोसो दूर रहने वाला…