लोक अभिरक्षक कार्यालयातुन आरोपीला मिळाली होती मोफत विधी सेवा
नांदेड(प्रतिनिधि)- येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत लोक अभिरक्षक कार्यालयाकडुन मोफत विधी सेवा पुरविलेले आरोपी नामे हेमंत श्रीराजपाल कपूर रा. कानपुर या तुरूंगबंदी आरोपीची मुख्य न्यायदंडाधिकारी नांदेड श्रीमती किर्ती जैन (देसरडा) यांनी नियमित फौजदारी खटला क 474/202४ या प्रकरणात एका दिवसात प्रकरण चालवून आरोपी व फिर्यादीला न्याय देवून दोन महिण्यापासून बंदिस्त असलेला आरोपी नामे हेमंत श्रीराजपाल कपून यांची निर्दोष मुक्तता केली. सदरिल प्रकरणात विधी सेवेमार्फत अॅड. वृषाली जोशी यांनी विशेष प्रयत्न करून आरोपीला निर्दोष मुक्त करण्यास व योग्य सल्ला देण्यास मदत केली त्यांनी केलेल्या विशेष कामगिरीचे सर्व स्तरातुन कौतुक होत असून जिल्हा विधी सेवेचे सचिव श्रीमती.डी.एम. जज मॅडम यांनी अभिनंदन केले त्यांना या प्रकरणात लोकअभिरक्षक कार्यालयातील अॅड. कल्याणी कुलकर्णी व अॅड. रणजीत भुयारे अॅड.एच.व्ही. संतान, अॅड.शे.शकिल व अॅड.ए.व्ही. सराफ यांचे सहकार्य लाभले.
लोकअभिरक्षक कार्यालयाकडुन तुरूंगबंदी, महिला, पिडीत, अनु. जाती. अनु. जमातीतील व्यक्ती, मानसिकदृष्टया दुर्बल किंवा दिव्यांग व्यक्ती तसेच आर्थिक मागास व तीन लाख रूपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेले आरोपी यांना मोफत विधी सेवा पुरविण्यात येते. याचा फायदा घेउन सदर प्रकरणात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड यांच्याकडे मोफत विधी सेवेसाठी अर्ज केला होता त्यानुसार त्यांना मोफत विधी सेवा पुरविण्यात आली. व बाजु मांडण्यात आली.