नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील गोपाळनगर, सांगवी या भागातील एक घरफोडून चोरट्यांनी 7 लाख 6 हजार 750 रुपये चोरल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना 20 एप्रिलच्या रात्री 10 ते 21 एप्रिलच्या पहाटे 8 वाजेदरम्यान घडली.
सेवानिवृत्त असलेले उदय व्यंकटराव नाव्हेकर (60) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.20 एप्रिलच्या रात्री ते 21 एप्रिलच्या पहाटे दरम्यान गोपाळनगर सांगवी येथील त्यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि घरातील कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिणे आणि रोख रक्कम असा एकूण 7 लाख 6 हजार 750 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. विमानतळ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक जोंधळे अधिक तपास करीत आहेत.
गोपाळनगर सांगवीमध्ये घरफोडले ; 7 लाखांचा ऐवज लंपास
