49 लाखाची रोकड, साडेचार किलो चांदी, साडेचार लाखाचे सोने जप्त
नांदेड :-लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये कडेकोट बंदोबस्त वाढविण्यात आला असून फिरत्या पथकांकडून मोठ्याप्रमाणात ठिकठिकाणी तपासणी सुरू आहे. तपासणी प्रत्येकाने सहकार्य करण्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे.
निवडणूक काळात नागरिकांनी व्यापाऱ्यांनी, व्यावसायिकांनी कोणतेही सामान सोबत ठेवतांना त्यासंदर्भाचे दस्तऐवज सोबत ठेवावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. आतापर्यंत 57 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यामध्ये साडेचार किलो चांदी व साडेचार लाखाचे सोन्यांचा समावेश आहे.
नांदेड जिल्ह्याची सिमा ही अन्य राज्याच्या सिमेसोबत लागली असल्यामुळे आणखी काटेकोर तपासणी करण्यात येत आहे. 13 एप्रिलच्या रात्री उशिरापर्यंत प्राप्त आकडेवारी नुसार आतापर्यंत जवळपास साडेचार किलो चांदी पकडण्यात आली आहे याची किंमत 3 लाख 2 हजार 45, पकडलेल्या सोन्याची किंमत ४ लाख 44 हजार 220 तर आतापर्यंत पकडलेल्या रोकडची किंमत 49 लाख 95 हजार 700 एवढी आहे. ही एकुण किंमत 57 लाख 41 हजार 965 एवढी जाते, अशी माहिती सि-व्हिजील कक्षाकडून प्राप्त झाली आहे.