दिवंगत पोलीसाच्या पूत्र आणि त्याच्या साथीदाराकडून जबरी चोरीचा ऐवज जप्त

नांदेड(प्रतिनिधी)-दोन युवकांना पकडून स्थानिक गुन्हा शाखेने एक जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. यात 42 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या दोन चोरट्यांमध्ये एक स्वगीर्य झालेल्या पोलीसाचा मुलगा आहे.
दि.25 मार्च रोजी मध्यरात्री मालेगाव रोडवरील सौरभ बार समोरून आपल्या घराकडे पायी जाणाऱ्या एका व्यक्तीला 3 जणांनी आपल्या मोटारसायकलवर सोडण्याचे आमिष दाखवले. त्या व्यक्तीचे घर शेतकरी पुतळ्याजवळ होते. पण दुचाकीवरील युवकांनी त्याला तेथे न सोडता दुचाकी दुसऱ्याच गल्लीत नेली आणि त्याच्याकडील मोबाईल आणि 2 हजार रुपये रोख रक्कम असा ऐवज बळजबरीने चोरून नेला होता.
या बद्दल स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर त्यांनी आपल्या पथकाला निर्देश दिले. तेंव्हा पोलीसांनी विजय मोहन भोंगे (21) रा.पवननगर भावसार चौक नांदेड आणि सुमेध गोपाल लांबा(19) रा.नवजीवननगर या दोघांना ताब्यात घेतले तेंव्हा त्यांनी 25 मार्च रोजी बळजबरी लुट केल्याची कबुली दिली. स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीसांनी या दोन चोरट्यांकडून बळजबरी चोरीला गेलेला मोबाईल, रोख रक्कम 2 हजार रुपये आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेली दुचाकी गाडी असा 42 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या चोरट्यांना पुढील तपासासाठी भाग्यनगर पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.या प्रकरणातील विजय मोहन भोंगे हा दिवंगत पोलीस मोहन भोंग यांचा सुपूत्र आहे.
या प्रकरणी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराय धरणे यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय, पोलीस उपनिरिक्षक आनंद बिचेवार, पोलीस अंमलदार गंगाधर कदम, मोतीराम पवार, महेश बडगु, ज्वालासिंग बावरी आणि गजानन बैनवाड यांचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *