नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय लोकशाहीमध्ये काम करतांना डॉ.बाबासाहेब आंंबेडकर यांच्या विचारावर चालने अत्यंत गरजेचे आहे असे प्रतिपादन पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले.
आज विश्र्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यंाच्या 133 व्या जयंतीदिनानिमित्त पोलीस अधिक्षक कार्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून श्रीकृष्ण कोकाटे बोलत होते. याप्रसंगी पुढे बोलतांना श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले की, डॉ.आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानावरच आम्ही काम करतो आहोत. त्या संविधानाने भारतीय लोकशाहीतील प्रत्येकाला जगण्याचे दिलेले अभिवचन पाळत आम्हाला भारतातील सर्वसामान्य माणसांना न्याय मिळवून द्यायचा आहे. हे अवघड काम आहे. पण डॉ.आंबेडकरांनी सांगितलेल्या मार्गांवर चालून आम्ही ते सहजपणे पार पाडू शकतो. त्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. डॉ.आंबेडकरांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. ती वाचत चला जेणे करून त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर केलेले लिखाण वाचले तर आपल्यालाही त्या मार्गांवर चालणे सोपे होईल.
या कार्यक्रमात राखीव पोलीस निरिक्षक विजय धोंडगे, पोलीस कल्याण विभागाचे पोलीस निरिक्षक नामदेव रिठ्ठे, राखीव पोलीस उपनिरिक्षक चौदंते यांच्यासह सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक सुर्यभान कागणे, जनसंपर्क विभागातील पोलीस अंमलदार रवि हराळे यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन पोलीस अंमलदार संजय सांगवीकर, मारोती कांबळे आणि विनोद भंडारे यांनी उत्कृष्टरित्या केले.