नांदेड(प्रतिनिधी)-लोहा शहरात राजरोसपणे जुगार चालतो हा घटनाक्रम स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीस अंमलदाराने तेथे मिलन डे नावाचा मटका पकडल्यानंतर सिध्द झाला.
दि.8 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस अंमलदार बालाजी दत्तात्रय तेलंग बकल नंबर 1138 यांनी आपल्या सहकाऱ्यांसह लोहा येथील शिवाजी चौकाजवळच्या शिवाजी मटन खानावळीसमोर सार्वजनिक रस्त्यावर सुरू असलेल्या मटका जुगारावर धाड टाकली. त्या ठिकाणी मिलन डे नावाचा मटका जुगार खेळणे आणि खेळवणे सुरू होते.स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीसांनी तेथून हजार 930 रुपये रोख रक्कम जप्त केली आहे. बालाजी तेलंग यांच्या तक्रारीवरुन शिवराज बालाजी चव्हाण (35), माधव धोंडीबा कावळे (34) आणि संतोष मारोती खरात (32) या तिघांविरुध्द महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ) नुसार गुन्हा क्रमांक 114/2024 दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार बालाजी लाडेकर यांच्याकडे देण्यात आला आहे.