नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस महासंचालक रशमी शुक्ला यांच्यावतीने राज्य गुप्त वार्ता विभागाचे सह आयुक्त निसार तांबोळी यांनी आज नांदेड पोलीस परिक्षेत्रातील लोकसभा निवडणुकीच्या संदर्भाने आढावा बैठक घेतली.
सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे देशभर गाज आहे. वेगवेगळे निवडणुक निरिक्षक वेगवेगळ्या लोकसभा मतदार संघामध्ये दाखल झाले आहेत. प्रत्येकाच्या कामाची व्याप्ती ही स्वतंत्र आहे. परंतू प्रत्येक राज्यातील निवडणुकीची शांतता व सुव्यवस्था अबाधीत राखण्याची जबाबदारी त्या-त्या राज्याच्या पोलीस महासंचालकांवर आहे. या अनुसरुनच महाराष्ट्रा पोलीस महासंचालक रशमी शुक्ला नांदेडला येणार आहेत. अशा चर्चा सुरु होत्या. परंतू कामांची अधिकता पाहता अनेक समस्या आहेत. तरी पण काम व्हावे ही अपेक्षा विभागप्रमुखांची असते. त्यानुसारच आज मुंबई येथील गुप्त वार्ता विभागाचे सहआयुक्त निसार तांबोळी नांदेडला आले होते. नांदेड पोलीस परिक्षेत्राच्या कार्यालयात नांदेड पोलीस परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ.शशिकांत महावरकर, नांदेडचे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, लातूरचे पोलीस अधिक्षक सोमय मुंडे, परभणीचे पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, हिंगोलीचे पोलीस अधिक्षक जी. श्रीधर, नांदेडचे अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांच्यासोबत निवडणुकीच्या संदर्भाने निसार तांबोळी यांनी आढावा बैठक घेतली. निसार तांबोळी नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक होते. त्यामुळे त्यांना नांदेड पोलीस परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांबाबत सविस्तर माहिती होतीच. या संदर्भाने आजच्या अधिकाऱ्यांकडून त्यांनी काय समस्या येवू शकतात आणि त्याच्या निराकरणासाठी पोलीस दलाची जबाबदारी काय आहे. यासंदर्भाने या आढावा बैठकीत चर्चा झाली. बैठक संपल्यानंतर निसार तांबोळी पुन्हा मुंबईकडे रवाना झाले.