पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम यांनी 10 म्हशी आणि 8 वासरांना मिळवून दिला मुक्तीचा श्वास

नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूरचे नुतन पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम यांनी अत्यंत कु्ररपणे होणारी जनावरांची वाहतुक रोखतांना आज 10 म्हशी आणि 8 वासरे यांना मोकळा श्वास करून दिला.
नांदेड शहराजवळ असलेल्या अर्धापूर पोलीस ठाण्यात सध्या कार्यरत असलेले नुतन पोलीस निरिक्षक चंद्रशेखर आनंदराव कदम यांना मिळालेल्या गुप्त माहिती आधारावर त्यांनी 4 एप्रिल रोजी मध्यरात्रीनंतर 1.30 आहिल्यादेवी चौक अर्धापूर येथे सापळा रचला. यांना मिळालेल्या माहितीनुसार ट्रक क्रमंाक एच.आर. 46 डी.4513 ला थांबवले. तपासणी केली असता त्यात गोवंश जातीचे 5 वर्षाच्या 5 म्हशी आणि व 4 वर्षाच्या 5 म्हशी तसेच मशीचे दुध पिते 12 दिवसांचे 8 वासरु असे 18 जनावर सापडले. त्यांना अत्यंत निर्धयीपणे वाहनात कोंबून जनांवरांची वाहतुक झाली. तसेच त्यांची देखभाल करण्यात कसुर झाली. या म्हशी आणि वासरांची किंमत 8 लाख 45 हजार रुपये आहे. तसेच त्यांची वाहतुक करणारा ट्रक 7 रुपयांचा आहे. असा एकूण 15 लाख 48 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाा आहे. पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम यांच्या तक्रारीवरुन अर्धापूर पोलीसांनी गुन्हा क्रमांक 171/2024 दाखल केला असून पोलीस अंमलदार कांबळे या प्रकरणाचा अधिक तपास करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *