राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत एमपीडीए अंतर्गत धाडसी कारवाई

नांदेड दि. 2 :- वारंवार शिक्षा होऊनही सुधारणा न होऊ शकलेल्या एका गुन्हेगारावर महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ डेंजरस ऍक्टिव्हिटी (एमपीडीए) कायद्याअंतर्गत नांदेडच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे. एक वर्षासाठी गुन्हेगाराची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.

नांदेड राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार कुणाल बाबुलाल जयस्वाल या गुन्हेगारावर महाराष्ट्र दारूबंदी गुन्ह्याच्या कलम 93 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. कुठल्याही प्रकारची शिक्षा अथवा दंडाची भीती नसणाऱ्या, अवैध मद्य व्यवहारातील आरोपींनी वारंवार गुन्हा केल्यास महाराष्ट्र दारूबंदी गुन्ह्याच्या कलम 93 अंतर्गत घेण्यात आलेल्या बंद पत्राचे उल्लंघन केल्यास किंवा कुठल्याही प्रकारच्या अवैध मद्य विक्री केल्यास  एमपीडीए प्रस्ताव दाखल करून गुन्हेगाराची रवानगी थेट कारागृहात करण्यात येते याची नोंद घ्यावी, असेही या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

अवैध मध्ये निर्मिती विक्री वाहतूक यासंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या १८००२३३९९९९ व व्हॉटस अॅप ८४२२००११३३ तसेच दूरध्वनी क्र. ०२४६२-२८७६१६ वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *