नांदेड,(प्रतिनिधी)-1 एप्रिल 2024 रोजी नांदेड जिल्ह्यात होणारे 4 बालविवाह महिला व बालविकास विभागाने ओळखले आहेत.आपली भूमिका कर्तव्यनिष्ठपणे पार पडली यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी त्यांची कौतुक केले आहे. तसेच बालविवाह होऊ नये किंवा कोणीही बालकांचे विवाह करू नये असे आवाहन जनतेला केले आहे.
बाल संरक्षण समितीला मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील कंधार, मुखेड येथे उच्चशिक्षित मुलांसोबत अल्पवयीन मुलींचे बालविवाह होत आहेत. तेव्हा बाल संरक्षण समितीने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याशी संपर्क साधून संबंधित यंत्रणांना तात्काळ निर्देश देऊन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर. आर. कांगणे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्रीमती विद्या अळणे यांनी बालविवाह होत असल्याबाबतची गोपनीय शहादिशा करून विना विलंब कर्मचारी येथे पाठवून होणारे बालविवाह रोखले आहेत. एकाच दिवशी चार बालविवाह रोखून ग्राम बाल संरक्षण समितीने आपली भूमिका योग्य रीतीने बजावली आहे. त्या कामात कल्पना राठोड, शीतल डोंगरे, ऐश्वर्या शेवाळे, दिपाली हिंगोले, निलेश कुलकर्णी यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.