मंगळवारी ६ अर्ज ;आतापर्यंत ११ अर्ज दाखल

१२६ अर्जाची उचल ; ४ एप्रिल शेवटची तारीख

नांदेड दि. २ :-  मंगळवारी 16 नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी सहा अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये चिखलीकर प्रतापराव गोविंदराव ( भारतीय जनता पार्टी ) विष्णू मारुती जाधव (राष्ट्रीय किसान पार्टी ) जगदीश लक्ष्मण पोतरे (अपक्ष ) कदम सुरज देवेंद्र (अपक्ष ) नागोराव दिगंबर वाघमारे (अपक्ष ) नय्यर जहाँ मोहम्मद फेरोज हुसेन (अपक्ष ) अशा सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले. आतापर्यंत एकूण ११ अर्ज दाखल झाले आहेत.४ एप्रिल ही अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख आहे.

मंगळवारी १६-नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी सहा अर्ज दाखल झाले आहेत. ४ एप्रिल ही अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख आहे. गेल्या गुरुवारी एक, शनिवारी दोन तर आज सोमवारी दोन, मंगळवारी ६ असे एकूण आतापर्यंत ११ अर्ज दाखल झाले आहेत. तर आतापर्यंत १२६ अर्जाची उचल झाली आहे. आतापर्यंत चिखलीकर प्रतापराव गोविंदराव ( भारतीय जनता पार्टी ) विष्णू मारुती जाधव (राष्ट्रीय किसान पार्टी ) जगदीश लक्ष्मण पोतरे (अपक्ष ) कदम सुरज देवेंद्र (अपक्ष ) नागोराव दिगंबर वाघमारे (अपक्ष ) नय्यर जहाँ मोहम्मद फेरोज हुसेन (अपक्ष ) वसंतराव बळवंतराव चव्हाण(इंडियन नॅशनल काँग्रेस ) म्हणून महारुद्र केशव पोपळाईतकर (अपक्ष )अकबर अख्तर खॉन, साहेबराव भिवा गजभारे, जफर अली खाँ मेहमूद अली खाँ पठाण यांनी अर्ज दाखल केला आहे. लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात नांदेड लोकसभा निवडणूक होत आहे. २८ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहे. उद्यापासून पुढील २ दिवस अर्ज दाखल करता येणार आहे. अर्जाची छाननी ५ एप्रिलला होईल. अर्ज ८ एप्रिलपर्यंत मागे घेता येईल. ८ तारखेला अंतिम उमेदवार निश्चित होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *