महिलांनाही कायद्याची माहिती असावी-न्यायमुर्ती दलजितकौर

नांदेड(प्रतिनिधी)-महिलांमध्ये कायद्याविषयी जनजागृती झाली पाहिजे. कायद्याचा वापर करतांना जपून वापर करावा असे मत न्यायमुर्ती दलजितकौर यांनी व्यक्त केले.

जागतिक महिला दिनाच्यानिमित्ताने स्वराज्य महिला बचत गट आमदारनगर नांदेड यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या म्हणून न्यायमुर्ती दलजितकौर ह्या बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अश्र्विनी जगताप, पोलीस निरिक्षक प्रकाश कुबडे, अशोक सुर्यवंशी, चंद्रकांत कदम, प्रविण मगरे अमोल देशपांडे, स्वराज्य महिला बचत गटाच्या अध्यक्षा अनुराधा गणेश मठपती, बालाजी धनगिरे, संतोष दगडगावकर यांची यावेळी उपस्थिती होती.

यावेळी न्यायमुर्ती दलजितकौर बोलत असतांना म्हणाले की, कायद्याविषयची माहिती महिलांना असणे आवश्यक आहे आणि अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून कायद्याची माहिती मोठ्याप्रमाणात होते. महिलांनी आपले अधिकार, आपला हक्क कोठे वापरावा आणि काय नाही याची माहिती अशा शिबिराच्या माध्यमातून मिळते. एखादीवेळेस महिलेवर अन्याय अत्याचार होत असेल तर त्यांना कायद्याची माहिती असल्यानंतर त्यांना ती उपयोगात पडू शकते. यावेळी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनंदा ऐडके, अनुसया नरवाडे, रंजना कांबळे, केसर कल्याणकर, धु्रपता पानपट्टे आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *