नांदेड(प्रतिनिधी)-शादी डॉट कॉम या संकेतस्थळावरचे गिफ्ट मिळविण्यासाठी 6 हजार पाऊंडस हे इंग्रजांचे विदेशी चलन बदलून देण्यासाठी 1 लाख 45 हजार 700 रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार घडला आहे.
बालाजी दिलीपसिंह तेहरा (26) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांना शादी डॉट काम या संकेतस्थळावर बक्षीसाचे आमिष दाखवून त्या बक्षीस बॉक्समध्ये 6 हजार इंग्रजांचे विदेशी चलन आहेत ते बदलून घेण्यासाठी वेगवेगळ्या बॅंक खात्यावर राज गुप्ता, राजविर यादव आणि आणखी एक या लोकांनी 1 लाख 45 हजार 700 रुपये घेवून आर्थिक फसवणूक केली आहे. हा प्रकार 17 फेबु्रवारी 2024 ते 19 फेबु्रवारी 2024 दरम्यान घडला.
नांदेड ग्रामीण पोलीसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 420,419,504 आणि 34 नुसार गुन्हा क्रमांक 262/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक गणेश चव्हाण यांच्याकडे देण्यात आला आहे.