पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करणाऱ्या तिघांना जन्मठेप आणि प्रत्येकी 70 हजार रुपये रोख दंड

नांदेड(प्रतिनिधी)-सन 2017 मध्ये पोलीस कर्मचाऱ्यावर जिवघेणा हल्ला करणाऱ्यांना तिघांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी तिन जणांना जन्मठेप आणि प्रत्येकी 70 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. दंड वसुल झाल्यानंतर त्यातील 1 लाख रुपये जखमी पोलीस अंमलदाराला देण्याचे आदेश न्यायाधीश बांगर यांनी दिले आहेत.
दि.3 एप्रिल 2017 रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस अंमलदार मोहन उत्तमराव हाके बकल नंबर 664 हे आपली नोकरी संपल्यानंतर रात्री अर्थात 4 एप्रिलच्या 00.15 वाजेच्यासुमारास घराकडे जात असतांना अंकुर हॉस्पीटलजवळ त्यांना गुन्हा क्रमांक 58/2017 कलम 354 मधील फरार आरोपी विरासिंग बसरुसिंग सरदार आणि त्याच्यासोबत दोन जण दिसले. पोलीस अंमलदार मोहन हाकेने विरासिंगला पकडण्याचा प्रयत्न केला असता तिघे दुचाकीवर बसून पळू लागले. मोहन हाकेेने त्यांचा पाठलाग केला. तेंव्हा ते विनायकनगर भागात घुसले. तेथे त्या तिघांनी गाडी थांबवून खाली उतरले आणि एकाने माझ्यावर दगडफेकला तो माझ्या तोंडावर लागला आणि माझे दात पडले. मी चक्कर आल्याने खाली पडलो तेंव्हा विरासिंग दुसऱ्याला सांगत होता. ठोल्या घाव काड याचा गेम वाजवूत तेंव्हा विरासिंगने माझ्यावर खंजीरने हल्ला केला. त्यामुळे मला जबर जखम झाली. मी आरडाओरड केली तेंव्हा तेथील बरेच लोक पळत आहे. तेंव्हा विरासिंगने मला धमकी दिली की, पुन्हा मला अटक करायला आला तर तुझे काम संपलेच समज. त्यानंतर मला लोकांनी दवाखान्यात नेले आणि माझ्यावर उपचार झाला. पोलीस अंमलदार मोहन हाकेच्या तक्रारीवरुन शिवाजीनगर पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 307, 325, 332, 506 आणि 34 नुसार गुन्हा क्रमांक 102/2017 दाखल केला. पोलीस उपनिरिक्षक दिनेश काशीद यांनी या प्रकरणाचा तपास पुर्ण केला. या प्रकरणातील फरार आरोपी विरासिंगला स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीसांनी अमरावती तेथून पकडून आणले होते. त्याही वेळेस त्याने पोलीसांवर हल्ला केला होता. पण याबाबत त्याचा गुन्हा दाखल आहे की नाही याची माहिती मिळाली नाही.
या प्रकरणात न्यायालयात जवळपास 10 साक्षीदारांनी आपले जबाब नोंदवल्यानंतर उपलब्ध झालेल्या पुराव्या नुसार न्यायाधीश बांगर यांनी या प्रकणातील आरोपी विरासिंग उर्फ विऱ्या बसरुसिंग सरदार (22), दिपक उर्फ लोला तारासिंग ठाकूर (23) आणि गिरीश उर्फ ठोल्या गंगाराम कोटेवाड(24) या तिघांना भारतीय दंड संहितेच्या कलम 307 नुसार जन्मठेप आणि प्रत्येकी 50 हजार रुपये रोख दंड , दंड न भरल्यास दोन वर्षाची सक्तमजुरी, भारतीय दंड संहितेच्या कलम 332,34 नुसार सात वर्ष सक्तमजुरी आणि 10 हजार रुपये रोख दंड दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरी दंड संहितेच्या कलम 325 नुसार तिन वर्ष सक्तमजुरी आणि 7 हजार रुपये रोख दंड तसेच दंड संहितेच्या कलम 506, 34 नुसार दोन वर्ष सक्तमजुरी आणि 3 हजार रुपये रोख दंड अशा वेगवेगळ्या शिक्षा ठोठावल्या.ठोठावण्यात आलेल्या सर्व शिक्षा एकत्रीत भोगायच्या आहेत. भारतीय हत्यार कायदा आणि क्रिमिनल लॉ अमेंटमेंट या कलमांमधून तिघांची सुटका झाली. या तिघांना प्रत्येकी 70 हजार रुपये रोख दंड ठोठावण्यात आला आहे. दंडाची रक्कम वसुल झाल्यानंतर त्यातील 1 लाख रुपये जखमी पोलीस अंमलदार मोहन उत्तमराव हाके यांना देण्याचे आदेश दिले आहेत.या प्रकरणातील विऱ्याला पहिल्यांदाच शिक्षा झाली आहे पण इतर दोघे शिक्षा मिळविण्यात सुध्दा नामांकित आहेत. विऱ्यावर दरोडा आणि इतर गुन्हे प्रलंबित आहेत. या खटल्यात शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार वसी आणि सुवर्णा निकम यांनी पैरवी अधिकाऱ्याचे काम योग्यरितीने पुर्ण केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *