नांदेड(प्रतिनिधी)-पोलीसांनी मेहनत केल्यानंतर एका प्रवाशाचा ऍटो विसरलेला 4 लाख रुपयांचा ऐवज त्यांना परत देण्यात आला आहे. प्रवाशांनी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासह नांदेड जिल्हा पोलीस दलाचे आभार व्यक्त केले आहे.
नांदेड शहरातील पुजा राहुल भट्टड रा.सातारा ह.मु.दिलीपसिंग कॉलनी वजिराबाद नांदेड या 24 मार्च रोजी गोविंदबाग गार्डन ते वजिराबाद हा प्रवास ऍटोत करून आल्या. त्यांच्यासोबत असलेली ऐवजाची बॅग त्यांनी ऍटोत विसरली. त्या ऐवजामध्ये एक हिरांचा हार, दोन मोबाईल आणि रोख रक्कम असा 4 लाख रुपयांचा ऐवज होता. घडलेला प्रकार पुजा भट्टड यांनी वजिराबाद पोलीस ठाण्यात सांगितला. वजिराबाद पोलीसांंनी याबद्दल पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना मार्गदर्शना मागितले तेंव्हा श्रीकृष्ण कोकाटे यांनी सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक गंगाप्रसाद दळवी यांना आदेशीत केल्यानंतर त्यांनी गोविंदबाग गार्डन ते वजिराबाद या रस्त्यावरील असंख्य सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. पुजा भट्टड यांनी सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे त्या ऍटोचा क्रमांक एम.एच.26 बी.डी.419 असल्याचे दिसले. या ऍटोचा चालक रुपसिंघ रामसिंघ मल्ली हा होता. ऍटो चालकाचाा शोध घेतल्यानंतर त्याने मला बॅग सापडली आहे. मी त्या बॅगला काही छेड-छाड केलेली नाही. बॅगचे काय करू विचारातच मी आहे. तेंव्हा त्याने ती ऐवजाची बॅग पोलीस अधिक्षकांच्या समक्ष प्रवाशी महिलेला दिली. ही कामगिरी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनात सायबर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरिक्षक गंगाप्रसाद दळवी, पोलीस अंमलदार राजेंद्र सिटीकर, साहेबराव कदम आणि अनिल बिरादार यांनी पुर्ण केली. प्रवाशी महिला पुजा भट्टड यांनी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासह नांदेड जिल्हा पोलीस दलाला आभार व्यक्त करतांंना त्यांचे मनभरून आले होते. पोलीस अधिक्षकांनी ऍटो चालक रुपसिंघ मल्ली यांचाही सन्मान केला. यासोबतच पोलीसांनी ऍटो चालकांनाा आवाहन केले आहे की, वाहन चालक आणि धारकांनी त्यांच्या ऍटोमध्ये कोणत्या प्रवाशाचे काही साहित्य विसरून राहिले तर ती वस्तु, तो ऐवज पोलीस ठाण्यात आणुन जमा करावा जेणे करून मालकाला त्याची वस्तु परत देण्यास मदत होईल.