नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील एक पोलीस उपनिरिक्षक, एक श्रेणी पोलीस उपनिरिक्षक एक सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक, चार पोलीस अंमलदार आणि एक महिला पोलीस अंमलदार यांना निरोप देतांना पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोेकाटे यांनी आता तुम्हा सर्वांना आपल्या मनासारखे जिवन जगण्याची संधी उपलब्ध झाली आहे असे सांगतांना सर्व सेवानिवृत्त पोलीसांचा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सहकुटूंब सन्मान केला.
आज पोलीस अधिक्षक कार्यालयातील मन्मथ सभागृहामध्ये पार पडलेल्या सेवानिवृत्त पोलीसांच्या सन्मान समारंभात पोलीस अधिक्षक बोलत होते. आजपर्यंत साहेब रागावेल, वेळेत काम झाले पाहिजे, आपल्यापेक्षा लहान अधिकारी आणि पोलीस अंमलदार आपले ऐकणार नाही अशा अनेक चिंता सांभाळत तुम्ही पोलीस दलातील आपली सेवा पुर्ण केली आहे. याबद्दल तुमचे अभिनंदन. आजच्या पुढे तुम्हाला कोणतीही चिंता असणार नाही तसेच आपल्या मनासारखे जीवन जगण्याची संधी आहे असे सांगून श्रीकृष्ण कोकाटे यांनी सेवानिवृत्तांचा सहकुटूंब सत्कार केला.
या प्रसंगी गृहपोलीस उपअधिक्षक डॉ.अश्र्विनी जगताप, पोलीस कल्याण विभागाचे पोलीस निरिक्षक नामदेव रिठ्ठे, जनसंपर्क विभागातील सहाय्यक पोलीस निरिक्षक नवशाद पठाण यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी, अनेक पोलीस अंमलदार, सेवानिवृत्त पोलीसांचे कुटूंबिय उपस्थित होते.
आज पोलीस उपनिरिक्षक सुभाष दत्तराम धात्रक(नियंत्रण कक्ष), श्रेणी पोलीस उपनिरिक्षक राजारामा उत्तमराव गणाचार्य(पोलीस ठाणे कंधार), सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक शिवाजी महाजन तोटेवाड (पोलीस ठाणे ईस्लापूर), पोलीस अंमलदार गंगाराम लक्ष्मण शेट्टे (पोलीस ठाणे लिंबगाव), अब्दुल वाहिद अब्दुल खयुम(पोलीस मुख्यालय), भानुदास गुंडप्पा भुसेवाड(शहर वाहतुक शाखा), रामराव पोमा आडे (पोलीस ठाणे कुंडलवाडी), सखुबाई गणपतराव रणविरकर(पोलीस मुख्यालय) असे आठ जण आपली पोलीस सेवा पुर्ण करून सेवानिवृत्त झाले आहेत.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पोलीस अंमलदार शमा गौस यांनी केले. पोलीस कल्याण विभागातील राखी कसबे यांनी उत्कृष्ट नियोजन केले.