इतवारा उपविभागाच्या विशेष गुन्हे शोध पथकाने तिसरे गावठी पिस्टल पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-इतवारा उपविभागाच्या विशेष गुन्हे शोध पथकाने एक बनावट पिस्तुल पकडले आहे. त्यांनी केलेली ही तिसरी कार्यवाही आहे.
इतवारा उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांच्या विशेष गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार अर्जुन मुंडे, संतोष बेल्लुरोड, श्रीराम दासरे, भाऊसाहेब राठोड, अंकुश पवार, शेख इमरान, बालाजी कदम आदींनी 27 मार्च रोजी दुपारी बिलालनगर येथील गल्ली क्रमांक 5 मध्ये कॉलेटी हॉटेलजवळ शेख शाहिद शेख मौला (26) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे एक गावठी पिस्टल सापडले. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात शेख शाहिद विरुध्द भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन गढवे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *