नांदेड(प्रतिनिधी)-लोकसभा निवडणुकीच्या आचार संहितेचे लक्ष ठेवून नांदेड जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात ऊस, हाळद आणि केळी या उभ्या पिकांमध्ये काळे झेंडे लावून आपला संताप व्यक्त केला. हा संताप राष्ट्रीय महामार्गांच्या मावेजामध्ये पाच पट रक्कम मिळण्याऐवजी फक्त दुप्पट रक्कम मिळत आहे यासाठी आहे.
नांदेड जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या बांधवावरून राष्ट्रीय महामार्ग जात आहेत. ज्यात अर्धापूर तालुक्यातील उमरी, मालेगाव, देळुप, कांचननगर, अर्धापूर या भागातील शेतकऱ्यांनी त्यांच्या शेताजवळून जाणाऱ्या शक्तीपिठ महामार्गामध्ये त्यांना पाच पट रक्कम मिळण्याऐवजी फक्त दुप्पट रक्कम मिळत आहे. याचा निषेध व्यक्त करतांना आपल्या शेत जमीनीत उभ्या असलेल्या केळी, ऊस आणि हाळद या पिकांमध्ये काळे झेंडे लावून अनोखा संताप व्यक्त केला.
ज्या शेत जमीनीतून हा शक्तीपिठ राष्ट्रीय महामार्ग जात आहे. त्यांना बाजार मुल्याच्या तुलनेत पाच पट रक्कम मिळायला हवी. पण त्यांना फक्त बाजार भावाच्या दुप्पट ऐवढाच मोबदला मिळत असल्याने त्यांनी हा अनोखा निषेद व्यक्त केला. महामार्गाच्या शेजारी अनेक अल्पभुधारक शेतकरी सुध्दा आहेत. त्यांच्याा जमीनी महामार्गात गेल्यानंतर ते भुमिहिनपण होणार आहेत. शेतकऱ्यांच्या या अनोखा आंदोलनाचा काय परिणाम सरकारवर होतो हे दिसायला वेळ लागणार आहे.