नांदेड(प्रतिनिधी)-इतवारा पोलीस उपअधिक्षकांनी त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर एका 22 वर्षीय युवकाला पकडून त्याच्याकडून एक गावठी पिस्टल एक जिवंत काडतूस पकडले आहे.
इतवारा उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर त्यांनी वसरणी येथील अन्सारी हॉस्पीटलसमोर सापळा रचून एक 20 ते 22 वर्षीय युवकाच्या हालचालीवर लक्ष ठेवून त्याला ताब्यात घेतले. त्याचे नाव गंगाप्रसाद दयानंद महाजन (22) रा.मु.पो.तामसा ता.हदगाव असे आहे. त्याच्याकडून पोलीसांनी एक गावठी पिस्तुल, एक जिवंत काडतूस पकडले. नांदेड ग्रामीणचे पोलीस अंमलदार संतोष बेलुरोड यांनी दिलेल्या तक्रारीवरुन त्या युवकाविरुध्द भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा क्रमांक 227/2024 दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास नांदेड ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विजयकुमार कांबळे हे करीत आहेत. गावठी पिस्तुल बाळगणाऱ्या गंगाप्रसाद महाजनला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने 26 मार्च पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. ही बंदुक गंगाप्रसाद महाजनने विक्री करण्यासाठी आणली होती.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक, पोलीस अंमलदार अर्जुन मुंडे, संतोष बेलुरोड, श्रीराम दासरे, सायबर विभागाचे पोलीस अंमलदार राजू सिटीकर यांचे कौतुक केले आहे.