नांदेड:- लोकसभा निवडणुकीच्या तयारी संदर्भात शनिवारी रात्री आठ वाजता आकाशवाणी नांदेड वर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची मुलाखत प्रसारित केली जात आहे.
जिल्ह्यात आगामी लोकसभा निवडणूक शांतता व सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाची प्रशासकीय पातळीवर जोरात तयारी सुरु आहे. जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक विषयक तयारीच्या त्याअनुषंगाने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची मुलाखत आकाशवाणी नांदेड केंद्रावरुन प्रसारित होणार आहे.
त्यांची मुलाखत नांदेड येथील पत्रकार अनुराग पोवळे यांनी घेतली आहे. सदर मुलाखतीचे प्रसारण शनिवार दिनांक 23 मार्च 2024 रोजी रात्री 8.00 वाजता आकाशवाणी नांदेड केंद्र वरून प्रसारित होणार आहे.