महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या प्रदेश उपाध्यक्षपदी डॉ.अभयकुमार दांडगे

मुंबई ( प्रतिनिधी ) – महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नांदेडचे पत्रकार डॉ. अभयकुमार दांडगे यांची निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई संलग्न राज्य शाखेच्या शिफारसीनुसार तसेच प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे , राज्य संघटक संजयजी भोकरे यांच्या मान्यतेने प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या स्वाक्षरीने डॉ. अभयकुमार दांडगे यांना पत्रकार संघाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवडीचे पत्र आज प्रदान करण्यात आले. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या माध्यमातून यापूर्वी नांदेडचे जिल्हाध्यक्ष तसेच मराठवाड्याचे विभागीय सचिव व त्यानंतर प्रदेश कार्यकारणी सदस्य या पदावर डॉ. अभयकुमार दांडगे यांनी पत्रकार संघाची ध्येयधोरणे आणि कार्य प्रामाणिकपणे केल्याबद्दल त्यांची प्रदेश उपाध्यक्ष म्हणून आज निवड करण्यात आली. डॉ. अभयकुमार दांडगे हे २०१० मध्ये नांदेडचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यानंतर त्यांची २०१५ मध्ये मराठवाडा विभागीय सचिव म्हणून निवड करण्यात आली. तर २०१८ पासून ते प्रदेश कार्यकारणी सदस्य म्हणून कार्यरत होते आजवर केलेल्या त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रदेश कार्यकारिणीवर उपाध्यक्ष म्हणून निवडण्यात आले असल्याचे प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांनी कळविले आहे. या निवडीबद्दल डॉ अभयकुमार दांडगे यांचे मराठवाड्यातील अनेक पत्रकारांनी तसेच महाराष्ट्रातील दिग्गज पत्रकार मंडळींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *