नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांमध्ये जाणवलेला सकाळचा भुकंप तीन वेळा आला होता. याची नोंद स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील भुकंप मापक यंत्रात झाली आहे. भुकंपाचा केंद्र बिंदु नांदेड ते वारंगा जातांना दिसणाऱ्या रामेश्र्वर तांडा या गावात असल्याची माहिती स्वारातीमने प्रसार माध्यमांना माहितीसाठी पाठविली आहे. संचालक एमजीएम, एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विद्यान केंद्र छत्रपती संभाजीनगर येथील श्रीनिवास औंधकर यांनी दिली आहे.
आज सकाळी 6 वाजून 8 मिनिटाला झालेला भुकंप रिक्टरस्केलवर 4.5 मॅग्नीट्युटचा नोंदवला गेला. हा भुकंप धक्का तिन्ही जिल्ह्यांमध्ये लाखो लोकांनी अनुभवला त्यानंतर 11 मिनिटांनी सकाळी 6.19 वाजता 3.6 मॅग्नीट्युटचा दुसरा धक्का भुकंप मापक यंत्रात नोंदवला गेला आहे. त्यानंतर पुन्हा 6 मिनिटांनी सकाळी 6.24 वाजता 1.8 मॅग्नीट्युटचा भुकंप मापक यंत्रणांनी नोंदवला.
मराठवाड्यात 1993 ला झालेल्या किल्लारी भुकंपानंतरचा सर्वात मोठा धक्का आज जाणवल्याची माहिती देण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात असलेल्या कुरूंदा व दांडेगावच्या उत्तर भागातील रामेश्र्वर तांडा या गावच्या उत्तर भागात भुकंपाचे केंद्र असल्याची माहिती संचालकांनी दिली आहे. या भुकंपाची खोली 10 किलो मिटर आत आहे अशी माहिती सांगण्यात आली आहे.सकाळी 4.5 मॅग्नीट्युटचा भुकंप नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात सर्वत्र जाणवला. 1993 मध्ये किल्लारी येथे झालेल्या भुकंपानंतरचा मराठवाड्यातील हा सर्वात मोठा धक्का आहे. नुकसान झाले नाही तरी आता दक्षता घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात असलेल्या भुकंप मापक यंत्राची व्यापकता 100 किलो मिटर परिघात आहे.
सन 2007 मध्ये नांदेड शहरात भुकंपाचे धक्के जाणवले. त्यावेळी प्रशासनाच्यावतीने असे सांगण्यात आले होते की, या ठिकाणी काही तरी परिक्षण चालू आहे आणि त्यातून होणाऱ्या आवाजाला जनता भुकंप म्हणत आहे. ते आवाज भरपूर मोठे असायचे. नांदेड जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या अधिकाऱ्याने तब्बल 8 दिवसात आपल्या शासकीय घरात दुसरे घर बनवले होते आणि ते घर भुकंप निरोधक होते. अनेक अधिकारी आपल्या चार चाकी वाहनांमध्ये झोपायचे. अनेक नागरीक उघड्या मोकळ्या मैदानात झोपायचे.आता तब्बल 17 वर्षानंतर जाणवलेले भुकंपाचे धक्के प्रशासकीय स्तरावर मंजुर करण्यात आले आहेत. किल्लारीमध्ये सुध्दा असेच भुकंपाचे धक्के व्हायचे. त्यावेळी सर्व किल्लारी गाव रिकामे करण्यात आले होते. पण काही महिन्यात पुन्हा भुकंपाचे धक्के जाणवले नाहीत म्हणून तेथील नागरीक परत आले आणि श्री गणेश विसर्जनाच्या रात्री 1993 मध्ये तेथे भुकंप आला आणि गावात फक्त मारोती मंदिर आणि सरपंचांचे घर पडले नाही. बाकी सर्व गावातील घरे पडली होती असंख्य लोक मरण पावले होते. सरपंचांचे घर भुकंप निरोधक तयार करण्यात आले होते म्हणून ते पडले नाही आणि मारोतीरायाचे मंदिर का पडले नाही हे देवच जाणे.
आता नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिह्यांमध्ये हादरा देणारा हा आजचा भुकंप आज काही नुकसानदायक ठरला नाही परंतू यावर आता काळजी करण्याची नक्कीच गरज आहे. कारण किल्लारीचा अनुभव हा सुध्दा असाच होता. अनेक भुकंप झाल्यानंतर तेथे भुकंपाने दिलेला धक्का आजही मराठवाड्यातील लोक विसरु शकले नाहीत तर किल्लारीच्या लोकांची अवस्था काय असेल याची आठवण करणे म्हणजे अंगावर काटे स्वत: आणण्यासारखे आहे.
व्हिडीओ…