नांदेड,(प्रतिनिधी)-आज सकाळी 6.9 वाजेच्या सुमारास नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. नांदेड शहरातील असंख्य नागरिक घराबाहेर आले होते. भूकंपाचे धक्के 4.6 रिक्टर स्केल एवढ्या तीव्रतेचे होते. भूकंपाचे केंद्र आखाडा बाळापूर पासून 15 किलोमीटर अंतरावर दाखवले जात आहे.
मागे काही वर्षांपूर्वी नांदेड शहराला भूकंपांच्या धक्क्यांनी मोठा धक्का दिला होता. अनेक ठिकाणी दररोज भूकंपाचे धक्के जाणवायचे तेव्हा काही जण दररोज घरा बाहेर झोपायचे,काही जणांनी भूकंप निरोधक घर बनवले होते.काही जणांनी आपली संपत्ती विकून दुसऱ्या जागी पलायन केले होते. पण काही वर्षानंतर पुन्हा एकदा भूकंपाने नांदेड जिल्ह्याला हादरा दिला आहे. नांदेडच नव्हे तर परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांना सुद्धा भूकंपाने धक्के दिले आहेत. आज सकाळी 6.9 वाजता भूकंपाचा धक्का जाणवला. अनेक ठिकाणी जोराचे आवाज झाले, असे लोक सांगत आहेत. काही ठिकाणी घरातील भांडे खाली पडले, असे लोक सांगत आहेत. असंख्य लोक घराबाहेर येऊन थांबले होते. भूकंपाने झोपलेल्या लोकांना आपण पलंगावरून पडतो की काय असा भास झाला.तरीपण भूकंपाने काही मोठे नुकसान झाले नाही पण मागील काही दिवसांपूर्वी आणि आज असे सलग दोन वेळेस भूकंपाचे धक्के जाणवल्याने नांदेड जिल्ह्यातील जनता हादरली आहे. सोबतच शेजारी हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांमध्ये सुद्धा भूकंपाची झटके जाणवले आहेत. भूकंपाचे केंद्र हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर पासून पंधरा किलोमीटर अंतरावर असल्याचे सांगितले जात आहे. प्रशासनाच्यावतीने जनतेला आवाहन करण्यात आले आहे की कोणी घाबरण्याचे कारण नाही. भूकंपाचे धक्के त्रिव्र नव्हते ज्यामुळे नुकसान झाले नाही, परंतु दक्षता घेणे आवश्यकच आहे.