नांदेड(प्रतिनिधी)- राज्यामध्ये ओबीसी बहुजन पक्षाच्यावतीने जवळपास 22 ठिकाणी उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष प्रकाशअण्णा शेंडगे यांनी दिली होती. याच अनुशंगाने नांदेड लोकसभेसाठी चळवळीतील कार्यकर्ता म्हणून ओळख असणाऱ्या ऍड.अविनाश भोसीकरांना उमेदवारी देवून निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे.
ओबीसी बहुजन पक्षाच्यावतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेला सटवाजी माचनवार, जिल्हाध्यक्ष महेंद्र देमगुंडे, ऍड.प्रदीप राठोड, लक्ष्मण लिंगापुरे, नागनाथ देशमुख, भाटेगावकर महाराज, माऊली गिते यांच्यासह आदींची उपस्थिती होती.यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाशअण्णा शेंडगे यांनी नांदेड लोकसभेसाठी ऍड.अविनाश भोसीकर यांना उमेदवारी दिली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष देमगुंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नांदेड लोकसभेत प्रस्तापितांनाा त्यांची जागा दाखवून देऊ बहुजन, ओबीसी, दलित, अल्पसंख्याक, मुस्लीम हा सर्व मतदार प्रस्तापितांच्या विरोधात मतदान केल्याशिवाय राहणार नाही आणि बहुजन पक्षाचा उमेदवार आगामी काळात निश्चितच विजयी होईल याची खात्री मला असल्याची ग्वाही उमेदवार ऍड. अविनाश भोसीकर यांनी दिली.