नांदेड(प्रतिनिधी)-लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी शनिवारपासून सुरू झाली असून आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी शनिवारी दुपारी 4 वाजेच्यानंतर लागू झाली. यात नांदेड जिल्हा 3 लोकसभा मतदार संघात विभागला गेला आहे. यातील नांदेड हिंगोली, एका टप्यात तर लातूर दुसऱ्या टप्यात अशी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
नांदेड जिल्ह्यात 9 विधानसभा मतदार संघ आहेत. हे तीन लोकसभा मतदार संघात विभागले आहेत. यात नांदेड लोकसभा मतदार संघात नांदेड-दक्षीण, नांदेड उत्तर, भोकर, देगलूर, नायगाव आणि मुखेड हे सहा विधानसभा मतदार संघ नांदेड लोकसभा मतदार संघात आहेत. तर किनवट आणि हदगाव हे दोन विधानसभा हिंगोली लोकसभा मतदार संघात आहेत आणि लोहा विधानसभा मतदार संघ हा लातूर लोकसभा मतदार संघात आहे. यात नांदेड आणि हिंगोली या दोन लोकसभेसाठी दुसऱ्या टप्यातील 26 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि हिंगोली लोकसभेसाठी 7 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. याची मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे.
नांदेड लोकसभेसाठी 28 मार्च पासून अधिसुचना जाहीर केली जाणार आहे. यात 4 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करणे, 5 एप्रिल रोजी छाननी, 8 एप्रिल रोजी उमेदवारी मागे घेणे आणि 26 एप्रिल रोजी मतदान आणि 4 जून रोजी मतमोजणी असा हा निवडणुकीचा कार्यक्रम राहणार आहे. यासाठी एकूण 18 लाख 36 हजार 464 मतदार हे मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये 9 लाख 47 हजार 871 पुरूष तर 8 लाख 88 हजार 557 महिला असणार आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणुक अधिकारी अभिजित राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भारताचे मुख्य निवडणुक आयुक्त राजीवकुमार यांनी आज 3 वाजता पत्रकार परिषद घेवून भारतातील लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सांगतांना भरपूर माहित्या सांगितल्या. त्यात सात टप्यात भारतीय लोकसभेच्या मतदार संघात निवडणुका होणार आहेत. सोबतच मनी पावर वापरला जाणार नाही यावर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत असे सांगितले. राजकीय नेत्यांना आपल्या शब्दात सुचना देतांना राजीवकुमार म्हणाले “अधुरी हसरतों का ईलजाम हम पर लगाना ठिक नही वफा खुदसे होतील नही खता ईव्हीएमपर करते हो’ अर्थ याचा असा आहे की, तुम्हीच ईमानदार नाहीत आणि ईव्हीएमवर दोष लावून काय फायदा. माझ्याकडे नवीन पध्दतीनुसार 12 पास झालेल्या युवकाला घर बसल्या मतदान कार्ड मिळायची तयार आहे. सोबतच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत मतदान न करणाऱ्यांना शास्ती लावायची तयारी सुध्दा आहे. पण त्यासाठी कायदा तयार करावा लागतो. कायदा तयार करणे हे माझ्या हातात नाही. यानंतर पत्रकारांना प्रश्न विचारण्याची वेळ देण्यात आली. 5 ते 6 पत्रकारांचे प्रश्न ऐकून भारताचे मुख्य निवडणुक आयुक्त राजीवकुमार उत्तर देत होते. त्यामध्ये एका पत्रकाराने प्रश्न विचारला की, ईव्हीएमवर अनेकांचा आक्षेप आहे. तेंव्हा राजीवकुमार म्हणाले की, आजपर्यंत 40 खटले दाखल करण्यात आले. ज्यामध्ये ईव्हीएमवर आक्षेप घेण्यात आला. त्या सर्व प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्याा घटनापिठाने ईव्हीएम सर्वोत्कृष्ट मतदान प्रणाली आहे असा निर्णय दिलेला आहे. पण मी असे सांगतो की, “निंदक न्यारे राखीऐ’ म्हणजे अर्थात आपल्या शेजारी आपली निंदा करणारी लोक असावेत म्हणजे आपण चांगले करू शकतो. या पत्रकार परिषदे एक पत्रकार असेही होते की, ज्यांनी आरडा ओरड केल्यानंतर त्यांना पत्रकार परिषदेतील प्रश्न विचारण्यासाठी बाईक देण्यात आला. त्यावेळी त्या पत्रकारांनी बोललेल्या शब्दांवर निवडणुक आयुक्त राजीवकुमार म्हणाले की, तुम्हाला या ठिकाणी बोलतांना येणार नाही आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरच दिले नाही. अर्थ असा आहे की, प्रश्न विचारतांना सुध्दा अक्कल लागते. निवडणुकीमध्ये खर्च करण्याच्या विषयावर सुध्दा राजीवकुमार म्हणाले लोकसभा निवडणुकीत 80 लाख रुपये खर्च करता येतील. जम्मू आणि काश्मिरमध्ये निवडणुका का घेत नाहीत या पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देतांंना मुख्य निवडणुक आयुक्त राजीवकुमार म्हणाले किधी-कधी कायदा वाचत जा किंवा निवडणुक आयुक्त कार्यालयाच्या वेबसाईटवर शोधाशोध करत जा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे उपलब्ध आहेत. अर्थातच आम्ही लिहिलेल्या सुगीच्या दिवसांचा वेळ आलेला आहे.