नांदेड(प्रतिनिधी)-हवामान खात्याने राज्यात 16 आणि 17 मार्च या कालावधीत काही भागात जोरदार वादळी वाऱ्यांसह गारांचाा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला होता. यानुसार दि.16 रोज शनिवारी सकाळपासूनच वातावरणात बदल जाणवत होता.जिल्ह्यातील काही भागात वादळ वारासह गारांचा पाऊस पडला आहे.
सकाळपासूनच उन्हाची तिव्रता कमी जाणवत होती. शनिवारी दुपारी 4 वाजेच्यानंतर जिल्ह्यातील नाायगाव, बिलोली, कंधार या तालुक्याताील काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसाबरोबरच वादळी वारेही मोठ्याप्रमाणात सुटल्याने ग्रामीण भागातील अनेक जणांच्या घरावरील पत्रे उडून गेली होती. तर याच बरोबर जोरदार गारांचाही पाऊस पडला आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास या पावसाने हिसकावून घेतला सध्या मोठ्या प्रमाणात उन्हाळी ज्वारी, गहु, हरभरा, टरबूज, केळी या पिकांसह अनेक पिकांचे नुकसान या पावसाने झाले आहे. सुरूवातीपासून शेतकरी या अवकाळी पावसाचा सामना याावर्षी करत आहे.
सध्या उन्हाची तिव्रता मागील आठ दिवसापासून अधिक जाणवत होती. पण हवामानात बदल झाल्यामुळे शनिवारी सकाळपासूनच उन्हाची तिव्रता कमी जाणवत असल्याने नागरीकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. हवामान खात्याने दि.16, 17 हे दोन दिवस अवकाळी पावसासह गारांचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे नांदेडकरांना अजून एक दिवस या अवकाळी पावसाचा सामना करावा लागणार आहे.
नायगाव व्हिडिओ…
देगलूर व्हिडिओ…