नांदेड,(जिमाका)-राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत महासंस्कृती, महानाट्य महोत्सवापाठोपाठ नांदेडमध्ये सोमवारी 18 मार्च रोजी कव्वाली महोत्सव होत आहे. राज्यभरातील विख्यात कव्वाली गायक यामध्ये सहभागी होत असून कव्वाली प्रेमी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे हा कार्यक्रम कुसुम सभागृह व्हीआयपी रोड नांदेड येथे होणार आहे. सायंकाळी 6.30 वाजता कव्वाली महोत्सवाला शुभारंभ होणार आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज पर्यटन मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह सर्व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
नांदेड व परिसरातील कव्वाली प्रेमींनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल, नांदेडचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, महानगरपालिका आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांनी केले आहे.