स्टार एअर नांदेड विमानतळावरून देशातील 5 शहरांसाठी 31 मार्च पासून विमानसेवा सुरू करणार

नांदेड(प्रतिनिधी)-स्टार एअरची विमानसेवा 31 मार्च 2024 पासून नांदेड येथून सुरू करण्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.दिल्ली,जालंधर, बैंगलूरु या शहरांसाठी दररोज विमानसेवा असणार आहे. सोबतच हैद्राबाद आणि अहमदाबाद या शहरांसाठी सुध्दा नांदेडहून विमानसेवा उपलब्ध होणार आहे.
नांदेड येथे भव्य विमानतळ तयार करण्यात आले. परंतू विमानसेवा ही कायम राहिली नाही.नांदेड विमानतळाचे व्यवस्थापन रिलायन्स कंपनीकडे आहे. त्यांनी सुध्दा व्यवस्थापन अयोग्य केले. परंतू रिलायन्स कंपनी म्हणते की, आम्हाला पैसेच दिले नाही तर आम्ही व्यवस्थाप कसे करणार. त्यामुळे मागील तीन वर्षापासून नांदेड येथील विमानसेवा बंद होती. यामुळे दुरून नांदेडला येणाऱ्या सिख बांधवांची सुध्दा अडचण झाली होती आणि तसेच इतर व्यक्तींची सुध्दा अडचण झाली होती. नवीन विमानसेवा सुरू झाल्यानंतर नांदेड येथून दिल्ली, जालंधर, बैंगलूरू, हैद्राबाद आणि अहमदाबाद अशा पाच शहरांना विमानसेवा मिळणार आहे. विमानसेवा बंद पडल्यामुळे मोठ्या शहरांशी नांदेडचे कनेक्शन आता पुढे चांगले होणार असून तीन वर्षानंतर सुरु होणाऱ्या या विमानसेवेचे स्वागतच होणार आहे.
हैद्राबाद -नांदेड ही विमानसेवा सोमवार, मंगळवार, बधुवार, गुरूवार आणि रविवार अशी असेल. 7.55 वाजता हैद्राबाद येथून निघणारे विमान नांदेडला 8.45 वाजता पोहचेल. नांदेडहून हैद्राबादकडे सोमवार, मंगळवार गुरूवार आणि रविवार अशी फेरी हे विमान करेल. नांदेड येथून सायंकाळी 4.30 वाजात निघेल आणि हैद्राबादला 5.20 वाजता पोहचेल. बुधवारी नांदेड-हैद्राबाद या विमानसेवेचे वेळापत्रक सकाळी 9.15 वाजता नांदेडहून निघेल आणि हैद्राबादला सकाळी 10.5 वाजता पोहचेल. अहमदाबाद-नांदेड ही विमानसेवा सोमवार, मंगळवार, गुरूवार आणि रविवार अशी असेल. अहमदाबादहून दुपारी 2.45 वाजता निघालेले विमान सायंकाळी 4 वाजता नांदेडला पोहचेल. नांदेडहून अहमदाबादकडे जाणारे विमान सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि रविवार अशा चार दिवशी उडेल. हे विमान सकाळी 9.10 वाजता नांदेडहून निघेल आणि 10.25 वाजता अहमदाबादला पोहचेल. बैंगलूरु येथून सकाळी 7.15 वाजता निघणारे विमान नांदेडला 8.35 वाजता पोहचेल. नांदेड ते दिल्ली जाणारे विमान सकाळी 9 वाजता नांदेडहून निघेल आणि 11 वाजता दिल्ली येथे पोहचेल हेच विमान दिल्ली ते जालंदर असे राहिल ते दिल्ली येथून सकाळी 11.25 वाजता पोहचेल आणि 12.25 वाजता जालंदरला पोहचेल. जालंदरहून हे विमान पुन्हा दुपारी 12.50 वाजता निघेल आणि 1.50 वाजता दिल्ली येथे पोहचेल. दिल्ली ते नांदेड हे विमान दुपारी 2.15 वाजता दिल्ली येथून निघेल आणि नांदेडला दुपारी 4.15 वाजता पोहचेल. नांदेड ते बैंगलूर जाणारे विमान दुपारी 4.45 वाजता निघेल आणि बैंगलूरू येथे सायंकाळी 6.05 वाजता पोहचेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *