नांदेड(प्रतिनिधी)-माझ्या बायकोला का काम लावते या कारणासाठी आईचा खून करणारा कुपूत्र हिमायतनगर पोलीसांनी गजाआड केला आहे.
दि.10 मार्च रोजी हिमायतनगरजवळील पोटा(बु) येथे अनिता दत्ता जळपते (46) यांचा मृतदेह सापडला. त्याबाबत मयत महिला अनिता यांचे बंधू मारोती संभाजी चिंतलवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अनिताचा मुलगा सचिन उर्फ गजानन दत्ता जळपते यानेच माझ्या बहिणीचा खून केला आहे असा आरोप पोलीस प्रथमीकीमध्ये आहे. मृतदेह सापडल्यानंतर हिमायतनगरचे पोलीस निरिक्षक जऱ्हाडे, सहाय्यक पोलीस निरिक्षक नामदेव मद्दे, पोलीस अंमलदार पाटील आदींनी याबाबत कायदेशीर कार्यवाही पुर्ण केल्यानंतर आज हिमायतनगर पोलीसांनी सचिन उर्फ गजानन जळपते यास अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक नामदेव मद्दे हे करीत आहेत.
आईचा खून करणारा कुपूत्र गजाआड
