पुरूषांशी ओळख वाढवून व्हिडीओ चित्रीकरणाच्या माध्यमातून खंडणी मागण्याचा नवीन प्रकार ; दोन महिला आणि तीन पुरूषांची टोळी

नांदेड(प्रतिनिधी)-पुरूषाशी ओळख करून त्यानंतर त्याचे नग्नचित्रीकरण महिलेसोबत करून ते चित्रीकरण व्हायरल करतो अशी धमकी देवून खंडणी मागण्याचा एक नवीन फंडा काल उघडकीस आला आहे. भाग्यनगर पोलीस ठाण्यात दोन महिला आणि तीन पुरूषांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या सर्व खंडणीखोरांना नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने ताब्यात घेतले आहे. परंतू प्रशासकीय स्तरावर यास कोणी दुजोरा देत नाही.
नांदेड शहरात वेगवेगळ्या भागांमध्ये असे अनेक प्रकार घडले आहेत अशी माहिती आहे. त्यानुसार अर्थव विलास डुब्बेवार (21) या रा.चिखलवाडी भोकर या विद्यार्थ्याने दिलेल्या तक्ररीनुसार सन 2024 च्या जानेवारी महिन्याच्यापुर्वी भोकर बाजारात सामान खरेदी करण्यासाठी गेलो असतांना 25 ते 30 वयोगटातील एक महिला भेटली. तिने मला कॉल करायचा आहे म्हणून माझा मोबाईल घेतला आणि अनोळखी फोन नं.9309408707 यावर माझ्या फोन क्रमांक 8698688842 वरून कॉल केला आणि माझा फोन मला परत दिला. दि.11 फेबु्रवारी 2024 रोजी मला 9309408707 या फोनवरून फोन आला. तेंव्हा मी निता बोलते आहे, तु नांदेडला आला तर मला कॉलकर तुझ्याशी काम आहे. 12 फेबु्रवारी 2024 रोजी मी नांदेडला आलो आणि निताला कॉल केला. तिच्या सांगण्याप्रमाणे प्रकाशनगर कॅनॉल रोड येथे एका इमारतीत गेलो. मला तेथे थांबायला सांगून निता बाहेर गेली. त्यावेळी दुसऱ्या रुममधून एक महिला बाहेर आली आणि त्याचवेळेस दोन मुले आली. मला मारहाण करून माझे कपडे कढायला लावे आणि दुसऱ्या रुममधील मुलीला बोलावून तिच्यासोबत माझे नैसर्गिक अवस्थेतील फोटो काढले आणि व्हिडीओ बनवला. आता ही व्हिडीओ व्हायरल करायची नसेल तर 1 लाख 50 हजार रुपये खंडणी दे असे सांगितले. मला पुन्हा कपडे घालायला दिले आणि बोलावलेल्या महिलेला तु तुझ्या रुममध्ये जा असे सांगितले. त्यानंतर मी माझ्याकडे पैसे नाहीत असे सांगितल्यानंतर फोन पे वर पैसे ट्रान्सफर कर असे सांगितले तेंव्हा मी 9860901003 या क्रमांकावर 40 हजार रुपये ट्रान्सफर केले. हा मोबाईल विशाल कोटीयनच्या नावावर आहे. 13 फेबु्रवारी रोजी मला9860901003 यावरून कॉल आला आणि मला सुरेश वाघमारे, नितीन आणि विशाल या तिघांनी खंडणीचे उर्वरीत 1 लाख 10 हजार रुपये देण्यास सांगितले नाही तर तुझा व्हिडीओ फोटो व्हायरल करू अशी धमकी दिली.
याप्रकरणी भाग्यनगर पोलीसांनी विशाल कोटीयन, निता, राधिका, नितीन आणि सुरेश वाघमारे अशा 5 जणांविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 384, 385, 386, 323, 506 आणि 34 नुसार गुन्हा क्रमांक 98/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सुरू आहे. हा सर्व घटनाक्रम घडला 12 फेबु्रवारी रोजी पण भितीमुळे तक्रारदाराने तक्रार दिली नव्हती.
खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खंडणीचा प्रकार घडविणाऱ्या दोन महिला आणि तीन पुरूष असे पाच जण स्थानिक गुन्हा शाखेच्या ताब्यात आहेत. परंतू या माहितीला प्रशासकीयस्तरावर दुजोरा मिळत नाही. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय आणि त्यांच्या सहकारी पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांनी खंडणी उकळण्याचा हा नवीन प्रकार उघडकीस आणल्याबद्दल त्यांचे कौतुकच व्हायला हवे. याप्रकरणात एकच तक्रारदार आहे. अशा प्रकारे अजून कोणाकडून खंडणी वसुल करण्यात आली असेल तर त्यांनी सुध्दा पोलीसांशी संपर्क साधून आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडावी असे आवाहन वास्तव न्युज लाईव्ह करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *