धर्माबाद,(प्रतिनिधी)- धर्माबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका शासकीय कर्मचारी महिलेचा तिच्या घरात घुसून विनयभंग करण्याचा प्रकार माजी मार्केट कमिटी सदस्याने केला आहे.
धर्माबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या एका शासकीय कर्मचारी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार 6 मार्च 2024 रोजी रात्री 10 वाजता त्या जेवण करून आपल्या घरात झोपल्या असताना 7 मार्च च्या रात्री 12.23 वाजता त्यांच्या घराचे दार वाजवण्यात आले. झोपेतून उठून महिलेने आपल्या घराचा लाईट लावला आणि पाहिले असता माधव शिंदे नावाचा व्यक्ती त्यांच्या घरासमोर उभा होता. तुम्ही एवढ्या अपरात्री घरी का आलात अशी विचारणा केली असता तो घरात शिरला आणि वाईट उद्देशाने महिलेचा हात धरला. महिलेने आरडा ओरड केल्यानंतर घर मालकीण आणि इतर मंडळी धावत आल्यानंतर मात्र माधव शिंदे पळून गेला. असे सांगतात की माधव शिंदे माजी मार्केट कमिटीचा सदस्य आहे.अर्थात राजकीय व्यक्ती आहे.जागतिक महिला दिनाच्या पूर्व रात्री घडलेल्या या प्रकाराबद्दल महिलेने दिलेल्या तक्रारीवरून धर्माबाद पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 354, 354(अ),452, 323, 506 नुसार गुन्हा क्रमांक 49/ 2024 दाखल केला आहे. धर्माबादचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांच्या मार्गदर्शनात या गुन्ह्याचा तपास सुरू आहे.
महिला गृहिणी असो, शासकीय कर्मचारी असो त्यांच्यावर आज भारताच्या स्वातंत्र्याला 77 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुद्धा अशा प्रकारचे अक्षम्य घटनाक्रम घडत आहेत. हा घटनाक्रम तर जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला झाला आहे या घटनेला भारताचे दुर्दैव म्हणावे की सुदैव हेच लिहणे खूप अवघड आहे.