अंत्योदय शिधापत्रिका धारकांसाठी साखर  नियतन 

नांदेड – सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिल्ह्यातील अंत्योदय शिधापत्रिका धारकांसाठी शासनाने ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर2023 या तीन महिन्यासाठी प्रतिमाह एक किलो साखर नियतन सुलभ पॅकींगमध्ये मंजूर केले आहे.

 

या तीन महिन्यासाठी शासनाकडून 1 हजार 548 क्विंटल साखर प्राप्त झाली आहे. पुढीलप्रमाणे तालुकानिहाय साखर नियतन देण्यात आले आहे. यात नांदेड तालुक्यासाठी 105, अर्धापूर 34, मुदखेड 38, कंधार 79.50, लोहा 27, भोकर 85, उमरी 66, देगलूर 126, बिलोली 113.50, नायगाव119, धर्माबाद 72.50, मुखेड 188, किनवट 94.50, माहुर 209, हदगाव 99.50, हिमायतनगर 91.50  असे एकूण 1 हजार 548  नियतन साखर नांदेड जिल्ह्याला प्राप्त झाली आहे. सर्व अंत्योदय शिधापत्रिका धारकांनी स्वस्त धान्य दुकानातून वरील तीन महिण्याच्या साखरेची उचल करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!