महापालिकेचा कर वाढ नसलेला 1712 कोटीचा अर्थ संकल्प सादर

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचा 2023-2024 सुधारीत व 2024-2025 चा मुळ अर्थसंकल्प 1712 कोटी 29 लाख अर्थसंकल्प दि.29 रोज गुरूवारी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी सभागृहात सादर केला.
महानगरपालिकेचा सन 2023-2024 सुधारीत व मुळ 2024-2025 चा अर्थसंंकल्प महानगरपालिकेने मान्य केला. यात सन 2023-2024 चा 1612 कोटीचा होता मात्र शासनाकडून कोणत्याही प्रकारचे अनुदान व टॅक्स कमी करण्यात आल्यामुळे अशा विविध कारणामुळे अर्थसंकल्पात कपात करण्यात आली. यामध्ये 1167 कोटीचा झाला आहे. यात सन 2024-2025 चा मुळ अंदाजपत्रक आज सादर करण्यात आले. यात 1712 कोटी 29 लाख रुपयांचा अर्थसंकल्प महानगरपालिकेच्या डॉ.शंकरराव चव्हाण सभागृहात विशेष प्रशासकीय सर्वसाधारण सभा घेण्यात आली होती. यावेळी अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, मुख्य लेखाधिकारी पक्वाणे, नगरसचिव तथा उपायुक्त अजितपालसिंघ संधू, लेखाधिकारी तु.ल.भिसे यांची प्रमुख उपस्थिती होती. सादर करण्यात आला. हा अर्थसंकल्प सादर करत असतांना महापालिका प्रशासनाने कोणत्याही प्रकारचा कर नांदेडकरांवर त्यांनी लादला नाही. विशेषत: पाणी पट्टी व कोणताही कर यात वाढविण्यात आला नाही. तरी देखील महानगरपालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी महानगरपालिकेच्या जागेवर बांधण्यात आलेल्या काबरानगर येथील शॉपींग सेंटरमधून येणाऱ्या काळात उत्पन्न वाढल जाईल. सध्या 4 कोटी 27 लाख रुपये ई-लिलावातून मिळाल आहे. याच बरोबर महानगरपालिकेचे जुने गाळे यामध्ये 30 कोटी रुपयांचा थकबाकी असून हे वसुलीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. याचबरोबर दोन विशेष प्रकल्प महानगरपालिका राबविणार आहे. यातून सोलार सिस्टीम 20 मॅगा व्हॅट याचबरोबर सध्या असणारे पथदिवे बदलून त्याठिकाणी एलईडी बसविण्यात येणार आहे. या वीज बचतीतून लाखो रुपये महानगरपालिकेचे बचत होणार तसेच महानगरपालिका विविध खर्चातून बचत करून महानगरपालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी येणाऱ्या काळात विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचे यावेळी आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *