नांदेड (प्रतिनिधी)-नळगे गल्ली कंधार येथे एका दार नसलेल्या घरात छापा मारुन पोलीसांनी 27 जुगाऱ्यांना पकडले आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम 2 लाख 93 हजार 100 रुपये आणि इतर अनेक मोबाईल यासह 7 लाख 64 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कंधार येथील पोलीस उपनिरिक्षक गोपाळ चंद्रभान इंद्राळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 17 सप्टेंबरच्या मध्यरात्रीनंतर पहाटे 4.30 वाजता नळगेगल्ली येथील गणेश श्रीनिवास यांच्या दार नसलेल्या घरात छापा मारला. तेथे एकूण 27 जुगारी 52 पत्यांचा तिर्रट नावाचा जुगार खेळत होते. त्या ठिकाणी सापडलेल्या व्यक्तींमध्ये सचिन शुक्राचार्य गुट्टे (30),ज्ञानोबा शिवाजी केंद्रे(26), दत्ता बालाजी केेंंद्रे(40), अविनाश सुभाष बोरटकर(20) , महेश नामदेव पिनाटे (29), रा.मुक्ताईनगर कंधार, लखन सोमनाथ काळेकर(31) रा.संभाजीनगर कंधार, सतिश बाबुराव नळगे (45), धनराज बालाजी लुंगारे(36) रा.नळगेगल्ली कंधार, स्वप्नील मधुकरराव कदम (33) रा.फुलेनगर कंधार, दिलीप बालाजी पवार(37), राजू मारोती पवार(34) रा.सितानगर कंधार, अतुल विश्र्वेश्र्वर पापीनवार(42) रा.जामकरगल्ली कंधार, चांदु शिवाजी साखरे(34), रमेश शिवाजी पवार(36) रा.पोलीस कॉलनी कंधार, पवनकुमार लक्ष्मण राठोड (30), तुषार संतोष गवळे(26) रा.विजयगड कंधार, साहेबराव मरीबा वाघमारे(33), अशोक मरीबा वाघमारे, राम सोमनाथ काळेकर(31) रा.महात्मा फुले सोसायटी कंधार, आकाश साहेबराव इंगोले(24) रा.कासारखेडा.ता.जि.नांदेड, सिन्नू चंदर साखळे(32), रुपक चंद्रकांत व्यवहारे(34) रा.वडारगल्ली कंधार, राजू बालाजी साखरे(34) रा.पिंपळगाव ता.नायगाव जि.नांदेड, माधव व्यंकटी गोरे (33) रा.सुलेगाव ता.नायगाव, बालाजी हनमंत केंद्रे (37) रा.स्वप्नभुमीनगर कंधार, कपील जळबा जोंधळे(34)रा.मानसपुरी कंधार, दिग्वीज दिगंबर मोरे (40) रा.मेनरोड कंधार अशा 27 जणांचा समावेश आहे. पोलीसांनी त्यांच्याकडून बदक छाप पत्ते, रोख रक्कम, मोबाईल असा एकूण 7 लाख 64 हजार 100 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. कंधार पोलीसांनी 27 जुगाऱ्यांविरुध्द महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ) नुसार गुन्हा क्रमांक 312/2024 दाखल केला आहे. कंधार येथील पोलीस उपनिरिक्षक सानप अधिक तपास करीत आहेत.