लोहा(प्रतिनिधी)-न्यायालयाने आदेश दिल्यानंतर शेतकऱ्यांचा माल खरेदी करून त्यांचे पैसे न देणाऱ्या तीन जणंाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची 11 लाख 51 हजार 946 रुपयांची फसवणूक केली आहे.
बालाजी कठीराम डिकळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 23 ऑगस्ट 2023 ते 12 सप्टेंबर 2023 दरम्यान ज्योतीबा दत्तात्रय वाघ (40), आडत व्यापारी रा.लोहा, रावसाहेब नारायण जाधव (60) रा.किवळा, रितेश राम डुकरे(35) रा.बहादरपुरा कंधार या तिघांनी 167.25 क्विंटल सोयाबीन, प्रति क्विंटल 5200 प्रमाणे असा एकूण 8 लाख 69 हजार 700 रुपयांचे पिक खरेदी केले. तसेच 2 लाख 82 हजार 246 रुपयांची तुर असा एकूण 11 लाख 51 हजार 946 रुपये किंमतीचा ऐवज खरेदी केला. एका महिन्यात पैसे देण्याचे आश्र्वासन दिले होते. परंतू पैसे दिले नाही तेंव्हा बालाजी डिकळेने लोहा न्यायालयात अर्ज क्रमांक 1395/2024 दाखल करून न्याय मागितला. त्यानंतर लोहा पोलीसांनी या तिन व्यापाऱ्यांविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 409, 34 प्रमाणे गुन्हा क्रमांक 309/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पल तपास पोलीस उपनिरिक्षक पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे.